आयपीएल २०२३ चालू आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सतरावा सामना खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल्सने उत्कृष्ट विजयाची नोंद केली. संघाचा वरिष्ठ खेळाडू रविचंद्रन अश्विनने सामन्यापूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, ज्यामध्ये तो ऑनलाइन जुगाराच्या प्रश्नावर खूप भडकला होता. खरे तर, तामिळनाडूच्या राज्यपालांनी २ दिवसांपूर्वीच त्यांच्या राज्यात ऑनलाइन जुगार, रमी, पोकर यांसारख्या खेळांवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले आहे.

वास्तविक, एका इव्हेंटमध्ये तो ऑनलाइन गेमिंग आणि क्रिकेटमध्ये मुलांना प्रोत्साहन देण्याबद्दल बोलत होता. तो म्हणाला, “माणसांनी मोबाईल फोन लहान मुलांपासून दूर ठेवला तर मुले नक्कीच बाहेर खेळायला जातील. मुलांसाठी क्रिकेटच्या कोणत्याही मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे.” यावेळी एका पत्रकाराने त्यांना ऑनलाइन rummy जुगाराबद्दल प्रश्न केला. त्यावर अश्विन संतापला. तो म्हणाला, “तुम्हाला हेडलाइन पाहिजे की सत्य. ज्याला हा खेळ खेळायचा असेल तो खेळेल. ज्यांना खेळायचे नाही त्यांनी खेळू नये. मी इथे काय सांगायला आलो आहे आणि तू मला कोणत्या दिशेने ओढत आहेस? बॅन असेल तर खेळू नका.”

सामन्यात काय झाले?

एमएस धोनी याच्यासमोर गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज संदीप शर्मा चांगलाच दबावात दिसला. बुधवारी (१२ एप्रिल) खेळल्या गेललेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना चाहत्यांसाठी चांगलाच रोमांचक ठरला. विजयासाठी सीएसकेला शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता. पण संदीप शर्माचा जबरदस्त यॉर्कर धोनी खेळ शकला नाही. परिणामी राजस्थानने हा सामना ३ धावांनी जिंकला सामना संपल्यानंतर संदीपने धोनीचे कौतुक केले.

हेही वाचा: IPL2023, CSKvsRR: आर. अश्विनने घेतला भर मैदानात पंगा! मांकडिंग रनआऊटवर रहाणेचे सडेतोड उत्तर, Video व्हायरल

सीएसकेला या सामन्यात विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी सीएसकेच्या चाहत्यांना शेवटच्या चेंडूवर्यंत विजयाच्या आशा दाखवल्या. पण संदीप शर्मा याने मात्र कसलेली गोलंदाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला. धोनीने शेवटच्या षटकात दोन षटकार मारले, पण शेवटचा षटकार त्याला मारता आला नाही. संदीप शर्माच्या मते एमएस धोनी होता म्हणून त्याला षटकातील पहिला षटकार मारता आला. इतर कोणत्याही फलंदाजासाटी असा शॉट मारने सोपी बाब नव्हते.

सामना संपल्यानंतर संदीप आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल सोबत आयपीएलसाठी चर्चा केली. यावेळी संदीप म्हणाला, “मी लसिथ मलिंगाकडून यॉर्कर शिकत आहे. मला असे वाटते की, ज्या चेंडूवर  धोनीने षटकार मारला. तो जो पहिला षटकार होता, तो चेंडू खूपच अवघड होता. पण तोदेखील एमएस धोनी आहे आणि त्यामुळे त्याला षटकार मारता आला. याच कारणास्तव मी चांगली गोलंदाजी केली, असे मला वाटते.”

हेही वाचा: IPL2023, CSKvsRR: “असं कधीच आधी…”, अंपायर्सच्या निर्णयावर अ‍ॅश अण्णाची नाराजी, IPL कॉन्सिलकडे केली ‘ही’ मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सामन्यातील शेवटच्या षटकाचा विचार केला, तर मैदानात दबाव होता. संदीप शर्मा देखील दबावात दिसत होता आणि सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईड टाकले. पहिल्या चेंडूवर धोनीने एकही धाव घेतली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र धोनीला लागोपाठ षटकार मारता आले. चौथ्या चेंडूवर धोनीने एक धाव घेतली आणि जडेजा स्ट्राईकवर आला. पाचव्या चेंडूवर जडेजाला देखील मोठा शॉट खेळता आला नाही आणि फलंदाजांनी पुन्हा एक धाव घेतली. शेवटच्या चेंडूवर संघाला पाच धावा हव्या असताना धोनी स्ट्राईकवर आला. पण संदीपने पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी करत सीएसकेला फक्त एकच धाव दिली. परिणामी आरसीबने तीन धावा राखून विजय मिळवला.