Ravindra Jadeja wins 14th ‘Man of the Match’ award for CSK: आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी पराभव केला. रवींद्र जडेजाने या सामन्यात सीएसकेसाठी चमकदार कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने अप्रतिम कामगिरी करुन दाखवली. त्याच्यामुळे सीएसके संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. या सामन्यातील विजयासह सीएसके संघाने आयपीएल १६ व्या हंगामात प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान या सामन्यात रवींद्र जडेजाने सुरेश रैनाचा एक विक्रम मोडला आहे.

रवींद्र जडेजाची चमकदार कामगिरी –

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १६ चेंडूत २१ धावा केल्या, त्यात एक चौकार आणि २ गगनचुंबी षटकार मारले. यानंतर त्याने गोलंदाजीत ४ षटकात केवळ १९ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. आयपीएलच्या इतिहासातील सीएसकेसाठी हा त्याचा १४वा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार होता. त्याचबरोबर त्याने सुरेश रैनाला (१२) मागे टाकले आहे. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेसाठी १५ ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकले आहेत. जडेजा ज्या फॉर्ममध्ये आहे. या मोसमात तो धोनीचा विक्रम सहज मोडू शकतो.

सीएसकेसाठी सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार विजेते –

महेंद्रसिंग धोनी – १५ वेळा
रवींद्र जडेजा – १४ वेळा
सुरेश रैना – १२ वेळा
माइक हसी – १० वेळा
ऋतुराज गायकवाड – ८ वेळा
फाफ डू प्लेसिस – ६ वेळा
शेन वॉटसन – ६ वेळा
मुरली विजय – ५ वेळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीएसके संघासाठी रवींद्र जडेजा महत्वाचा खेळाडू-

रवींद्र जडेजा २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. आयपीएल २०२२ मध्ये, सीएसके संघाने त्याला १६ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. जडेजाने अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात तो संघासाठी हिट ठरला आहे. तो आयपीएलमध्ये कोची टस्कर्स केरळ, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. आयपीएल २०२३ च्या १२ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ११३ धावा आणि १६ विकेट्स घेतल्या आहेत.