GT vs MI, Rohit Sharma Record: आयपीएल २०२५ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबईच्या फलंदाजांनी योग्य ठरवत दमदार सुरूवात करून दिली. रोहित शर्मासोबत डावाची सुरूवात करण्यासाठी रायन रिकल्टनच्या जागी जॉनी बेअरस्टो फलंदाजीला आला. दोघांनी आक्रमक सुरूवात करून दिली.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो तुफान सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या. आपला पहिलाच सामना खेळत असलेला जॉनी बेअरस्टो २२ चेंडूत ४७ धावांची खेळी करत माघारी परतला.

या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने ३३ धावा चोपल्या. रोहित शर्माकडे शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र, ८१ धावांवर फलंदाजी करत असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला.

आयपीएल स्पर्धेत ७००० धावा पूर्ण

रोहित शर्माने या सामन्यात फलंदाजी करताना आयपीएल स्पर्धेत ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने ८६१८ धावा केल्या आहेत. विराटने हा कारनामा २६६ व्या सामन्यात केला होता. तर रोहित शर्माने हा कारनामा २७१ व्या सामन्यात केला आहे. शिखर धवन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शिखरच्या नावे ६७६९ धावा करण्याची नोंद आहे. तर डेव्हिड वॉर्नरने ६५६५ धावा केल्या आहेत. या यादीत पाचव्या स्थानी असलेल्या सुरेश रैनाच्या नावे ५५२८ धावा करण्याची नोंद आहे.

‘आयपीएल’मध्ये ७००० धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा ठरला दुसरा फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली – ८६१८ धावा – २६६ सामने
रोहित शर्मा – ७००० धावा – २७१ सामने
शिखर धवन – ६७६९ धावा – २२२ सामने
डेव्हिड वाॅर्नर – ६५६५ धावा – १८४ सामने
सुरेश रैना – ५५२८ धावा – २०५ सामने