RCB vs GT Highlights Rohit Sharma: आयपीएल 2023 चा सीझन आता शेवटच्या टप्प्यांमध्ये पोहोचला आहे. गतविजेते गुजरात टायटन्स नॉकआउटसाठी पात्र ठरणारा पहिला संघ होता तर शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सने आपापल्या विजयांसह प्ले ऑफचे तिकीट बुक केले. रविवारी, मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार विजय मिळवून आपली भूमिका बजावली आणि गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून आयपीएलमध्ये मुंबईला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. आरसीबीच्या पराभवानंतर सामन्याच्या अगोदरचे रोहित शर्माचे विधान व्हायरल होत आहे. रोहितच्या या वाक्यामुळेच फाफ डू प्लेसिस च्या आरसीबीने चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर उपकारांची परतफेड केल्याचे काहीजण मस्करीत म्हणत आहेत. पण नेमकं असं रोहित म्हणाला तरी काय?

रोहित शर्मा काय म्हणाला?

आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सुरु होण्याआधी, रोहितने डु प्लेसिसच्या संघाकडे एका पूर्वीच्या उपकाराची आठवण करून देत आम्हालाही अशीच संधी द्या अशी मागणी केली हाती. मुंबईने आरसीबीला आयपीएल २०२२ मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरण्यास मदत केली होती.

“ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण आहे तेच तुम्ही नियंत्रित करू शकता आणि नंतर सर्वोत्तम परिणामांची आशा करू शकता. मी कोणाशीही बोललो नाही. जर आम्ही जे हवंय ते साध्य केलं नाही, तर त्यासाठी आम्ही स्वतःच दोषी आहोत. जर आम्ही प्लेऑफला पोहोचलो तर मी सर्व श्रेय संघाला देईन. गेल्या वर्षी, आम्ही आरसीबीवर उपकार केले होते. मला आशा आहे की ते सुद्धा आता उपकारांची परतफेड करतील. ”

RCB vs GT हायलाईट्स

दरम्यान, संध्याकाळच्या मुसळधार पावसानंतर, नाणेफेकीचा निर्णय घेण्यात आला जिथे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मैदानात ओल असल्याने आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत २० षटकात ५ विकेट्स गमावत १९७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत या सामन्यातही शतकी खेळी केली.सामना सुरू होण्यास उशीर झाला.

हे ही वाचा<< विराट कोहलीचा दुःखी चेहरा अन्…नवीन उल हकने पुन्हा शोधली डिवचण्याची संधी, Video पाहून भडकले फॅन्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिलने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने ४ विकेट्स गमावत १९८ धावा करून आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाली असून मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे.