Sunil Gavaskar Criticizes Wriddhiman Saha: आयपीएल २०२३ च्या ४४ व्या सामन्यात गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेल्या गुजरातला दिल्लीविरुद्ध कमी धावसंख्येच्या सामन्यात ५ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी गुजरातचा सलामीचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याच्यावर टीका केली, जो पहिल्याच षटकात खराब शॉट खेळला. साहाने आऊटस्विंग चेंडूंवर शॉट्स खेळण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आणि त्यानंतर एक चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टिरक्षक फिल सॉल्टच्या हातात गेला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली.
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात खलील अहमदने धक्का दिला. खलीलने साहाला ऑफ-स्टंपच्या लाईनवर सतत खेळण्यास भाग पाडले आणि नंतर त्याची विकेट घेतली. खलीलने ऑफ-स्टंप लाईनच्या बाहेर अनेक चेंडू चांगल्या प्रकारे स्विंग केले. ज्यावर साहाने अनेक वेळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. या प्रयत्नाच्या नादात त्यानी शेवटी आपली विकेट गमावली.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावसकर यांनी ऋद्धिमान साहाचा शॉट मूर्खपणाचा असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी खलील अहमदच्या गोलंदाजीवर ऑफ-स्टंपच्या बाहेर स्विंग करण्याच्या योजनेवर प्रकाश टाकला. बाद दिल्यानंतर साहाला वाटले बहुधा त्याने सरळ बॅटने खेळायला हवे होते. यावर गावसकर यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – IPL 2023: लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी एमएस धोनीनं कॅमेरामॅनसोबत केलं असं काही…मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले, “खूप उशीर झाला आहे मित्रा. जेव्हा तुम्ही असा शॉट खेळता, तेव्हा तुमचा सर्व अनुभव काही महत्वाचा ठरत नाही. तुम्ही डग-आउटमध्ये जाऊन त्या शॉटचा सराव करू शकता. तुम्ही ज्या शब्दांचा उच्चार ‘मूर्ख’ करता ते खेळलेल्या शॉट्ससाठी डबल ओके सह वेगळ्या पद्धतीने उच्चारले जाऊ शकतो.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्यामुळे गुजरात टायटन्स लक्ष्यापासून ५ धावा दूर राहिली. कर्णधार हार्दिक पांड्या शेवटपर्यंत नाबाद राहिला पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र, या विजयानंतरही त्यांचा संघ अव्वल स्थानावर आहे, तर दिल्ली तळाशी आहे.