Mumbai Indians vs Gujarat Titans Score Updates : आयपीएल २०२३ चा ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे मैदानावर रंगला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार ठोकून १०३ धावांची नाबाद खेळी करून आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. या धावांच्या जोरावर मुंबईने गुजरातला २१९ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, विजयासाठी २१९ धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.

मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून गुजरातचा फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. त्यामुळे गुजरातला २० षटकांत ८ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. राशिद खानने अप्रतिम फलंदाजी करत ३२ चेंडूत १० षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीनं ७९ धावांची नाबाद खेळी केली. परंतु, राशिदला गुजरातला विजय मिळवून देता आलं नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने या सामन्यात २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

IPL 2024 Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Match Score in Marathi
RR vs MI Highlights, IPL 2024: यशस्वी जैस्वालच्या शतकासह राजस्थानने मुंबईवर मिळवला सहज विजय, तिलक-नेहलची खेळी व्यर्थ
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईनं पंजाबच्या तोंडचा घास पळवला
Mumbai Indians vs Delhi Capitals match highlights in marathi
MI vs DC : मुंबई इंडियन्सने उघडले विजयाचे खाते, दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी उडवला धुव्वा
Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2024 Highlights in Marathi
IPL 2024 MI vs RR Highlights: मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅटट्रिक, राजस्थानने मुंबईवर ६ विकेट्सने मिळवला सहज विजय

मुंबईसाठी नवखा गोलंदाज आकाश मधवालने ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. पीयुष चावलानेही अप्रतिम गोलंदाजी करून दोन विकेट्स घेतल्या. कुमार कार्तिकेयनंही दोन विकेट्स घेत मुंबईला विजयाच्या दिशेनं नेलं. तर बेहरनडॉर्फने हार्दिक पांड्याला माघारी पाठवत गुजरातला मोठा धक्का दिला. गुजरातसाठी डेविड मिलरने २६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. मिलर बाद झाल्यानंतर राशिद खानने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तर इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाले.

रोहित शर्मा आणि ईशान किशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, राशिद खानच्या गोलंदाजीवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि मुंबईला मोठा धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेला नेहर वढेराही राशिदच्या गोलंदाजीचा शिकार झाला. परंतु, कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्युकमार यादव पुन्हा एकदा तळपला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. तसंच मुंबईचा नवखा फलंदाज विष्णू विनोदनेही अप्रतिम फलंदाजी केली.

मुंबईसाठी रोहित शर्मा (२९), ईशान किशन (३१), विष्णू विनोद (३०), नेहल वढेरा (१५), टीम डेव्हिड (५) धावा करून बाद झाला. पण त्यानंतर वानखेडे मैदानात सूर्यकुमार यादवचं वादळ आलं आणि मुंबईची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढली. सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार ठोकून १०३ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ विकेट्स गमावत २१८ धावांपर्यंत मजल मारली, त्यामुळे गुजराता विजयासाठी २१९ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.