scorecardresearch

Rohit Sharma Dance: रोहित शर्माने मेहुण्याच्या लग्नात डान्स करण्यासाठी गाळला होता घाम, पाहा सराव करतानाचा VIDEO

Rohit Sharma Dance Video: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यानंतर ३ दशलक्षाहून अधिक युजर्सनी तो पाहिला आहे.

Rohit Sharma Dance Video
रोहित शर्मा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Sharma Dance Practice Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर त्याच्या फलंदाजीसाठी खूप चर्चा करत असताना, त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. कर्णधार रोहित शर्माने आता त्याच्या एका डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दमदार डान्स मूव्ह करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्टन रोहितने कॅप्शनमध्ये लिहिले की व्हायब आहे, तर यानंतर मुंबई इंडियन्सने त्यांच्या कॅप्टनच्या या पोस्टवर कमेंट करत पूर्ण व्हायब कॅप्टन असल्याचे लिहिले.

मेहुण्याच्या लग्नात कर्णधार रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत होता, ज्यात पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा शर्मा देखील होते. कॅप्टन रोहितचा हा व्हिडीओ व्हायरल व्हायला जास्त वेळ लागला नाही. आत्तापर्यंत तो ३ मिलियन पेक्षा जास्त यूजर्सनी पाहिला आहे. हिटमॅन रोहित शर्माचे चाहतेही त्याच्या डान्स मूव्हचे कौतुक करत आहेत.

त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलनेही रोहितच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटातील लाल घाघरा गाण्यावर डान्स करताना दिसला आहे.

रोहित शर्मा यावेळी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या इराद्याने उतरणार –

रोहित शर्मा आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ च्या मोसमात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गेल्या मोसमात संघाची कामगिरी अजिबात चांगली नव्हती, ज्यामध्ये संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. दुसरीकडे, आगामी हंगामात जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती मुंबई इंडियन्स संघाला जाणवू शकते, परंतु जोफ्रा आर्चरच्या उपस्थितीने तो संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा – WPL 2023 Final MI vs DC: महिला प्रीमियर लीगच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस, PSL चॅम्पियनपेक्षा दुप्पट रक्कम मिळणार!

मुंबईची सर्वात मोठी ताकद –

आगामी स्पर्धेतील मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी ताकद त्यांची फलंदाजी असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन संघाची सलामी देतील. त्यानंतर सूर्यकुमार यादव, गेल्या मोसमातील स्टार तिलक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड्स आणि कदाचित डेवाल्ड ब्रेविस येतील. या फलंदाजीत कोणत्याही गोलंदाजीचे आक्रमण उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. याशिवाय जोफ्रा आर्चरच्या रूपाने संघाकडे वेगवान गोलंदाजीचे सर्वात मोठे हत्यार आहे. आयपीएल २०२३ मध्ये ही त्याची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. तसेच ट्रिस्टन स्टब्स सारखा हार्ड हिटिंग बॅट्समन आहे, ज्याला बेंचवर बसावे लागेल. परंतु संधी मिळाल्यावर तो संघांसाठी मोठा धोका देखील ठरु शकतो.

हेही वाचा – WPL 2023 Final MI vs DC: रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला फायनलसाठी दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

मुंबई इंडियन्स संघ –

कॅमेरॉन ग्रीन, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकेन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन यान्सन, ट्रिस्टन स्ट्रब्स आणि विष्णू विनोद.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 17:52 IST

संबंधित बातम्या