महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मंगळवारी खेळल्या गेलेल्या क्वालिफायर-१ सामन्यात, चेन्नईने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करून लीग सामन्यात अव्वल स्थान पटकावले. चेन्नईतील चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ६० आणि डेव्हॉन कॉनवेच्या ४० धावांच्या जोरावर २० षटकात ७ गडी गमावून १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात शुबमन गिल (४२) आणि राशिद खान (३०) व्यतिरिक्त गुजरात टायटन्सचे सर्व फलंदाज अपयशी ठरले आणि संघाला केवळ १५७ धावा करता आल्या. गायकवाडला त्याच्या खेळीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.

ब्राव्हो बाउंड्री लाईनवर सेलिब्रेशन करताना दिसला

१५ धावांनी हा विजय मिळवत चेन्नईने अंतिम फेरीत जागा निश्चित केल्याने सीएसके कॅम्प जल्लोषात बुडाला होता.हॉटेल रूमच्या लिफ्टमध्येच टीमच्या खेळाडूंनी डान्स केला. यादरम्यान, सीएसकेचे गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो अत्यंत उत्साहात दिसले, ज्यांनी तुषार देशपांडे आणि इतर खेळाडूंसोबत शानदार नृत्य केले. याआधी, गुजरातच्या मोहम्मद शमीला दीपक चहरने मॅचच्या डायव्हिंग करत अफलातून झेलबाद केले त्या मोमेंट्समध्ये देखील ‘डीजे ब्राव्हो’ बाउंड्री लाईन आनंद साजरा करताना दिसला.

IPL 2024 Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Highlights in Marathi
CSK vs LSG Highlights , IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ६ गडी राखून विजय, स्टॉइनिसच्या १२४ धावांची खेळी ऋतुराजच्या शतकावर पडली भारी
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

धोनी आयपीएल २०२४मध्ये खेळणार की नाही?

ब्राव्हो म्हणाला, “१०० टक्के तो २०२४ मध्ये सीएसकेसाठी खेळायला परत येईल, विशेषत: इम्पॅक्ट खेळाडूंच्या नियमासह तो आपली कारकीर्द आणखी लांबवू शकतो. आमच्या संघाची फलंदाजी खूप शेवटपर्यंत आहे. मला वाटतं अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्यासारखे खेळाडू सामन्यात खूप फरक पाडतात. त्यामुळे, तुम्हाला एम.एस.कडून फारशी गरज नाही, पण संघ दबावाखाली असताना आम्हाला शांत ठेवण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. सामन्यानंतर धोनीने आपल्या निवृत्तीच्या योजनांवर मोठा खुलासा केला तो म्हणाला की, “तो आयपीएलचा दुसरा हंगाम खेळायचा की नाही हे ठरवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे आणि तो म्हणाला की तो एक खेळाडू म्हणून असला तरीही तो संघाशी विचार विनिअमय केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही.”

हेही वाचा: IPL2023: आपुन जैसा टपोरी…, बंगळुरूचा संघ बाहेर पडताच ख्रिस गेल ‘द युनिव्हर्सल बॉस’चे खास ट्विस्ट, पाहा Video

धोनीने जगासमोर मोठा खुलासा केला

सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला, “मला माहीत नाही. माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी ८-९ महिने आहेत. मिनी लिलाव डिसेंबरच्या आसपास होईल. मग आता हा डोक्याला ताप कशाला घ्यायचा? माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे, पण चेन्नईसाठी कोणत्याही स्वरूपात असो, मी नेहमीच तिथे असेन, मला खरोखर माहित नाही. पाचव्या आयपीएल विजेतेपदासाठी, चेन्नई सुपर किंग्स २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळेल.”