Kasi Viswanathan and Ravindra Jadeja Viral Video: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यांच्यात काही मतभेद सुरू आहेत, अशा सर्व बातम्यांना खूप उधान आले आहे. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील क्वालिफायर -१ नंतर, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन अष्टपैलू रवींद्र जडेजाशी काही संवाद साधताना दिसले. दोघांच्या या संवादामुळे चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

या व्हिडीओमध्ये कासी विश्वनाथन रवींद्र जडेजासोबत अगदी वेगळ्या पद्धतीने बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आधी सीएसकेचे सीईओ जडेजाच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते. यानंतर त्यांनी जडेजाशी हस्तांदोलन केले आणि जडेजाच्या पाठ थोपटत पुढे गेले. त्यांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला होत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने २० मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा लीग सामना खेळला. या सामन्यातच महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यात काही संवाद पाहायला मिळाला. या घटनेनंतर जडेजा आणि त्याची पत्नी रविबा यांनी ‘कर्म’ असे ट्विट केले होते. मात्र, धोनी आणि जडेजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस –

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चिंता व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, “आशा आहे की जड्डूच्या पोस्टचा आणि या गोष्टीचा संबंध नाही, पण असे दिसते. आणखी एका युजरने लिहिले की, “चाहत्यांकडे जड्डूच्या विरोधात काहीही नाही. आम्ही त्याला उर्वरित संघाच्या खेळाडूंबरोबर मानतो. कधीतरी चेन्नईला या आणि बघा. दुसर्‍या वापरकर्त्याने आपली चिंता व्यक्त केली आणि लिहिले, “तो आनंदी दिसत नाही.” त्याचप्रमाणे या व्हिडिओवर सर्व चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2023: आकाश मधवालने एलिमिनेटरमध्ये रचला इतिहास, ‘या’ खेळाडूचा १३ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

या सीझनमध्ये जडेजाने या गोष्टीबद्दलही सांगितले आहे की, चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करताना पाहायचे आवडते, त्याला नाही. एका सामन्यानंतर जडेजा म्हणाला होता की, मी खेळायला आलो तर सगळे माझी आऊट होण्याची वाट पाहत असतात.