Virat Kohli On Shubman GIll : गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. गिलने ५८ चेंडूत १०१ धावांची शतकी खेळी केली. गुजरातने या सामन्यात हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला. गिलने दमदार शतक ठोकल्यानं त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताबा देऊन सन्मानित करण्यात आलं. गिलच्या या चमकदार कामगिरीनंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर त्याच्या फोटो शेअर करत सुंदर प्रतिक्रिया दिली. कोहलीने गिलला भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हटलं आहे. गिल भारतीय क्रिकेटच्या पुढील पिढीचं नेतृत्व करायला तयार आहे.

कोहलीने गिलबाबत कॅप्शनमध्ये लिहिलं, “कौशल्यांनी संपूर्ण शुबमन गिल. जा आणि पुढच्या पिढीचं नेतृत्व कर. देव तुझं चांगलं करो.” विराटने अशा प्रकारची प्रतिक्रिया देत घोषणा केलीय की, भविष्यात गिल भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाईल आणि कदाचित कर्णधारही बनेल. गिलने सतत अप्रतिम फलंदाजी करून सिद्ध करून दाखवलं आहे की, तो टीम इंडियाचा भविष्यातील सुपरस्टार आहे.

नक्की वाचा – SRH vs GT: गुजरातसाठी शुभसंकेत! नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुबमन गिलची झुंझार खेळी, IPL मध्ये पहिल्या शतकाला गवसणी

इथे पाहा पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Virat Kohli Instagram Story On Shubman Gill Viral
Virat Kohli Instagram Post

२०२३ मध्ये गिलने वनडेमध्ये द्विशतकी खेळी केली. टी-२० इंटरनॅशनलमध्ये शतक, टेस्टमध्ये शतक आणि आता पुन्हा एकदा गिलने जबरदस्त फलंदाजी करून आयपीएलमध्ये शतक ठोकलं. शुबमनने २०२३ मध्ये ५५० हून अधिक धावाही केल्या आहेत. गिलच्या दमदार कामगिरीमुळं विश्वक्रिकेटमध्ये तो किंग बनला आहे. जो आता भारताच्या पुढील पिढीचं नेतृत्व करायला तयार आहे.