MI vs RCB Virat Kohli Viral Photo: मुंबईतील वानखेडे स्टेडियम गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटप्रेमींनी तीर्थक्षेत्राप्रमाणे डोक्यावर घेतले आहे. या ठिकाणी अनेक प्रतिष्ठित सामने खेळले जातात पण २०११ ला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने २८ वर्षांनंतर ट्रॉफी जिंकल्याने या स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींचे विशेष प्रेम आहे. शिवाय क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीतील अंतिम सामना सुद्धा वानखेडेवर खेळला होता त्यामुळे सुद्धा या स्टेडियमला मान आहे. याच स्टेडियममधील सचिननंतर महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यातून प्रेक्षकांचे त्याच्यावरील प्रेम स्पष्ट दिसून येत होते. आता हाच क्षण किंग कोहलीच्या सुद्धा आयुष्यात आला आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या आयकॉनिक जिन्यावरून खाली उतरताना सचिन तेंडुलकरचा एक फोटो फार वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये सचिन ड्रेसिंग रूममधून मैदानात येत असताना त्याची झलक पाहण्यासाठी जिन्यापाशी चाहत्यांनी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या क्रिकेटच्या देवाला आपल्या कॅमेर्यात टिपण्यासाठी शेकडो हात वर आले होते. यानंतर काही वर्षांनी धोनीचा सुद्धा असाच फोटो चर्चेत आला होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये सचिन, धोनी व विराट कोहली हे एकाच पोजमधील फोटोत दिसत आहे.

विराटसाठी सामना ठरला वाईटच…

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२३ च्या ५४ व्या सामन्यात, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी, ९ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना केला. प्रथम फलंदाजी करताना, विराट कोहलीला अवघ्या एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवल्यामुळे पाहुण्यांची सुरुवात खराब झाली.

हे ही वाचा<<रिंकू सिंगचा ‘तो’ चौकार पाहून अर्शदीप पार रडलाच! शेवटच्या बॉलचा ‘हा’ Video मिस करू नका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णधार प्लेसिसच्या साथीने कोहलीने डावाची सुरुवात केली. तथापि, जेसन बेहरेनडॉर्फचा चेंडूने कोहलीच्या बॅटला चपखल बसल्याने तो आपला फॉर्म टिकवून ठेवू शकला नाही आणि इशान किशनने त्याचा सहज झेल घेतला.स्पर्धेच्या प्लेऑफसाठी पात्रता मिळवण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही संघ विजयासाठी आतुर होते. दोन्ही संघांचे क्रमवारीत १० गेममध्ये १० गुण आहेत. अशातच आता कालच्या सामन्यात मुंबईने सूर्याच्या दमदार बॅटिंगमुळे बंगळुरूवर सहज मात केली आहे