Who have dismissed batsmen most times on duck : आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने झाली. आतापर्यंत या हंगामात २५ सामने खेळले गेले असून दिवसेंदिवस या स्पर्धेतील रोमांचक वाढताना दिसत आहे. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल आघाडीवर आहेत. या तीन फलंदाजांच्या नावावर १७-१७ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम आहे. पण आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर फलंदाजांना बाद करणारे गोलंदाज कोण आहेत? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

सर्वाधिक वेळा फलंदाजांना शून्यावर बाद करणारे गोलंदाज –

या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाताना लसिथ मलिंगाने सर्वाधिक ३६ फलंदाजांना शून्यावर बाद केले. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमारने २९ वेळा फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. याशिवाय सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकणारा भुवनेश्वर कुमार हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्ससाठी खेळणाऱ्या ट्रेंट बोल्टने आयपीएल इतिहासात ९३ सामन्यांमध्ये २६ फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा ड्वेन ब्राव्हो या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात ड्वेन ब्राव्होने २४ फलंदाजांना खाते उघडू दिले नाही. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या उमेश यादवने २३ फलंदाजांना भोपळा फोडू दिलेला नाही.

हेही वाचा – PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारे टॉप-५ गोलंदाज –

१. लसिथ मलिंगा – ३६
२. भुवनेश्वर कुमार – २९
३. ट्रेंट बोल्ट – २६
४. ड्वेन ब्राव्हो – २४
५. उमेश यादव – २३