KKR vs SRH IPL 2024 Final : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना २६ मे (रविवार) रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन बनला आहे; तर सनरायझर्स हैदराबादचे दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

केकेआरचे गोलंदाज आंद्रे रसेल (३-१९), मिचेल स्टार्क (२-१४) आणि हर्षित राणा (२-२४) यांच्या दमदार कामगिरीमुळे आयपीएल फायनलमधील सर्वात कमी धावसंख्या असलेल्या एसआरएचला ११३ धावांत गुंडाळले. यावेळी प्रत्युत्तरात, वेंकटेश अय्यरच्या २६ चेंडूंत नाबाद ५२ धावांच्या खेळीने केकेआरच्या फलंदाजांनी अवघ्या १०.३ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करून तिसरे आयपीएलचे विजेतेपद मिळवले.

“गुजराती ब्रेन”, घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील ७० टक्के हिस्सा? नेटकरी म्हणाला, “भावाने आयुष्यभर….”

मात्र, आयपीएल फायनलच्या या निकालामुळे अनेक क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली आहे. आयपीएल फायनलनंतर एक्सवर Worst IPL हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागला आहे. केकेआरच्या संघाचे अभिनंदन करत अनेक एक्स युजर्सनी Worst IPL अशा कमेंट्स केल्या.

“प्रामाणिकपणे, ही आतापर्यंतची सर्वात वाईट आयपीएल फायनल होती, यापेक्षा सीएसके विरुद्ध आरसीबी हा सामना जास्त रोमांचक होता. तो सामना अंतिम सामन्यापेक्षाही मोठा होता,” अशी कमेंट एक युजरने केली आहे.

“अभिनंदन KKR! संपूर्ण संघ अभूतपूर्व होता. कोलकाता नाईट रायडर्स, हैदराबाद सर्वात वाईट आयपीएल. गौतम गंभीरला आज खूप अभिमान वाटला पाहिजे”, अशी कमेंट् दुसऱ्या एक युजरने केली आहे.

तर तिसऱ्याने लिहिले की, काव्या मारननेदेखील कोलकाता नाईट रायडर्सचे कौतुक केले. KKR vs SRH IPL 2024 फायनल.

एक्सवर ट्रेंडमध्ये असलेले काही मजेशीर मीम्स

केकेआरसाठी यंदाचा सीझन कसा होता?

या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने अप्रतिम कामगिरी केली. केकेआर संघाने या सीझनमध्ये १७ पैकी १४ सामने जिंकून सर्वांची मने जिंकली. कोलकाता संघाच्या या कामगिरीचे कारण म्हणजे सर्व खेळाडूंनी मिळून केलेली चांगली कामगिरी. या सीझनमध्ये KKR च्या ५ गोलंदाजांनी १५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या, केकेआरच्या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. फलंदाजीतही चार फलंदाजांनी ३५० पेक्षा जास्त धावा केल्या. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांनी केकेआर संघाला विजय मिळवून दिला.