Irfan Pathan says Ravindra Jadeja should be part of playing eleven : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील कसोटी मालिकेतील दुसरा केपटाऊन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असावी, यावर सध्या खूप चर्चा सुरु आहे. रवींद्र जडेजा केपटाऊन कसोटीत पुनरागमन करणार का? रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, तर रवी अश्विनला बाहेर बसावे लागू शकते. उदाहरणार्थ, रवींद्र जडेजा आणि रवी अश्विन यांच्यातील टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश करावा? या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने दिले आहे.

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणच्या मते, जर रवींद्र जडेजा तंदुरुस्त असेल, तर हा खेळाडू प्लेइंग इलेव्हनचा भाग असावा. म्हणजेच अश्विनऐवजी रवींद्र जडेजाला अगोदर प्राधान्य दिले जावे, असे इरफान पठाणचे मत आहे.

Loksatta viva IPL beyond cricket T20 World Cup
क्रिकेटपलीकडचे आयपीएल
UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…

‘रवींद्र जडेजा तंदुरुस्त असेल तर…’

इरफान पठाण म्हणाला की, “रवी अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनचा भाग असावा. रवी अश्विनने अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली असली, तरी अशा खेळपट्ट्यांवर रवींद्र जडेजा चांगला पर्याय ठरू शकतो. विशेषत: रवींद्र जडेजा हा सातव्या क्रमांकावर फलंदाज म्हणून चांगला पर्याय आहे.” याशिवाय इरफान पठाणने प्रसिध कृष्णाबद्दलही आपले मत मांडले.

हेही वाचा – Year Ender 2023 : यंदा क्रिकेट जगतात घडले ‘हे’ पाच अनोखे विक्रम, जाणून घ्या कोणते आहेत?

इरफान पठाण म्हणाला की, “प्रसिध कृष्णाला नेटमध्ये आत्मविश्वास वाटत, असेल तर त्याने केपटाऊन कसोटीत खेळावे. केपटाऊन कसोटीत प्रसिध कृष्णा प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल, तर मुकेश कुमारला संधी मिळायला हवी.” मात्र, पदार्पणाची कसोटी प्रसिध कृष्णासाठी चांगली ठरली नाही. पहिल्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने १९ षटके टाकली, पण त्याला फक्त १ विकेट घेता आली. त्याचवेळी प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सहज धावा केल्या. प्रसिध कृष्णाच्या १९ षटकांत विरोधी फलंदाजांनी ९३ धावा केल्या. यावरून या युवा गोलंदाजावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

हेही वाचा – IND vs SA : ‘डीन एल्गरची कमजोरी माहित होती, तर तुम्ही…’, इरफान पठाणने भारतीय संघाच्या रणनीतीवर उपस्थित केला प्रश्न

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.