World Cup 2023, India vs Australia Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारताचा पहिला सामना रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला १९९ धावांवर ऑलआउट केले. मात्र यानंतर टीम इंडियाची सुरुवातही लाजिरवाणी झाली. भारताचे टॉप ३ फलंदाज शून्यावर बाद झाले. भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच तीन आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. वर्ल्ड कप २०२३ मधील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना होता आणि बॅटिंगमध्ये त्याची सुरुवात लाजिरवाणी झाली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित आणि इशान सलामीला आले होते. इशान किशन पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर जोश हेझलवूडने दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरला शून्यावर बाद करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे की तीन आघाडीचे फलंदाज शून्यावर बाद झाले.

भारताने ४० वर्षे जुन्या इतिहासाची केली पुनरावृत्ती –

टीम इंडियाने २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात केली होती. पण त्याचा शेवट खूप वाईट झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध अशीच सुरुवात केली होती. त्या काळात भारताने अवघ्या ५ धावांवर आपले ३ फलंदाज गमावले होते. आता भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या २ धावांत आपले ३ फलंदाज गमावले. टीम इंडियासोबत विश्वचषकातील ही दुसरी वेळ आहे की दोन्ही सलामीवीर शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. झिम्बाब्वे विरुद्ध १९८३ मध्ये भारतासोबत पहिल्यांदाच अशी घटना घडली होती.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया कोणत्या रंगाची जर्सी परिधान करणार भगव्या की निळ्या? बीसीसीआयने केले स्पष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७१ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ५२ चेंडूंचा सामना करत ४१ धावा केल्या. लाबुशेनने २७ धावा केल्या. यादरम्यान जडेजाने भारताकडून ३ विकेट्स घेतल्या. त्याने १० षटकात २८ धावा देत २ मेडन्स टाकल्या. कुलदीप यादवने १० षटकात ४२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहनेही २ २ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली.