श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आले आहे. भारताच्या संघात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे, तर जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन या दोघांचे संघात पुनरागमन झाले आहे. भारताची श्रीलंकेविरूद्ध ५ जानेवारीपासून तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध १४ जानेवारीपासून क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. या दोन मालिकांसाठी BCCI ने सोमवारी संघाची घोषणा केली आहे.

मैदानात आलेल्या शार्दुलला काय सांगितलं?; जाडेजाने केला खुलासा

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतग्रस्त असल्यामुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. योग्य विश्रांती आणि उपचार घेतल्यानंतर वेस्ट इंडीजविरूद्धच्या एकदिवसीय सामन्याआधी त्याने नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. अखेर पूर्णपणे तंदुरूस्त झाल्यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.

Video : एकदा पाहाच युवा गोलंदाज नवदीप सैनीचा भन्नाट यॉर्कर…

भारताचा सलामीवीर शिखर धवन हा देखील दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकला होता. त्याचेही श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या निर्धारित षटकांच्या मालिकांसाठी संघात पुनरागमन झाले आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय समितीने नवी दिल्ली येथे या संघांची घोषणा केली.

#MSDhoni @ 15 … ‘कॅप्टन कूल’वर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याला श्रीलंकेविरूद्धच्या टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमी यालादेखील या मालिकेसाठी विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने जाहीर केला आहे.

विराट = रनमशिन… सलग चौथ्या वर्षी केला ‘हा’ विक्रम!

५ जानेवारी : भारत वि. श्रीलंका, पहिला टी २० सामना (गुवाहाटी)
७ जानेवारी : भारत वि. श्रीलंका, दुसरा टी २० सामना (इंदोर)
९ जानेवारी : भारत वि. श्रीलंका, तिसरा टी २० सामना (पुणे)

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

१४ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
१७ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
१९ जानेवारी : भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

टीम इंडियाचा वर्षाचा शेवट गोड

कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर भारताने २-१ अशी मालिका विजयाने केली.