भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मला ही संधी मिळाली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेचा विचार केल्यास ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे व त्याचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित एक दिवसाच्या दोन सामन्यांसाठी केदारला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. केदार याने नुकतेच भारत ‘अ’ संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ व दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामन्यांमध्ये भाग घेतला. त्याने एक दिवसाच्या या चार सामन्यांमध्ये ५६ धावांच्या सरासरीने २२५ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीचा भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला फायदा झाला.
केदार म्हणाला, पुढील वर्षी वन डे विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमधील कामगिरीचा निश्चितपणे विचार होणार आहे. हे लक्षात घेऊन मी दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन. मला भारतीय संघात स्थान मिळाले त्याचे श्रेय माझ्या आईवडिलांना व पत्नी यांना द्यावे लागेल. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच माझी कारकीर्द यशस्वी झाली आहे.
केदारचे वडील महादेव यांनी सांगितले, आमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या संधीचा लाभ उठवित केदार निश्चितपणे यशस्वी कामगिरी करील, अशी मला खात्री आहे. गेले दोनतीन वर्षे रणजी, आयपीएल आदी सामन्यांमध्ये त्याने सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्याच्या या कामगिरीचे आता चीज झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2014 रोजी प्रकाशित
या संधीचे सोने करीन -केदार जाधव
भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघात स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मला ही संधी मिळाली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेचा विचार केल्यास ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे व त्याचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
First published on: 11-11-2014 at 12:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar jadhav selected in indian a team