Kieron Pollard apologise female fan video viral : सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट २०२४ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाचे नेतृत्व करत आहे. सोमवारी किरॉन पोलार्डच्या नेतृत्त्वाखाली संघाने शाहरुखचा संघ लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा ४ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात नाईट रायडर्सने १९.१ षटकांत केवळ १३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने १७ षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. मात्र, या सामन्यात किरॉन पोलार्डबरोबर असे काही घडले की, त्याला आपल्या महिला चाहतीची माफी मागावी लागली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात किरॉन पोलार्डच्या वादळी खेळीने मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. किरॉन पोलार्डने १२ चेंडूत ३३ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ३ षटकार पाहायला मिळाले. त्यापैकी पोलार्डचा एक षटकार मिड-विकेट दिशेला गेला आणि चेंडू एका महिला चाहतीला लागला. पोलार्डने मारलेल्या षटकाराचा चेंडू महिला चाहतीच्या खांद्यावर आदळला. यानंतर ती वेदना होत असलेल्याने खांदा चोळताना दिसली.

पोलार्डने महिला चाहतीची मागितली माफी –

मुंबई इंडियन्सच्या न्यूयॉर्कवरील विजयानंतर, जेव्हा पोलार्डला समजले की त्याचा एक शॉट एका महिला चाहतीला लागला आहे, तेव्हा त्याने तिला भेटण्याचा निर्णय घेतला. पोलार्डने स्वतः त्या महिला चाहत्याकडे जाऊन तिची माफी मागितली. यानंतर पोलार्डने तिच्या पतीची माफी मागितली आणि तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घ्या असे सांगितले. यानंतर पोलार्डने पती-पत्नी दोघांसोबत सेल्फी घेतला आणि त्याची ऑटोग्राफ केलेली कॅपही दिली.

हेही वाचा – IND vs SL : रवींद्र जडेजाला टीम इंडियातून का देण्यात आला डच्चू? अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरॉन पोलार्ड ठरला विजयाचा हिरो ठरला –

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या विजयाचा किरॉन पोलार्ड हिरो ठरला. गोलंदाजी करताना त्याने नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला बाद केले. यानंतर जेव्हा त्याचा संघ अडचणीत आला तेव्हा त्याने २७५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवले. या विजयासह मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कने प्लेऑफ्ससाठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर या सामन्यात झालेल्या पराभवानंतर लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा स्पर्धेबाहेर पडला. या स्पर्धेत लॉस एंजेलिस संघाला आतापर्यंत ७ पैकी फक्त २ सामने जिंकता आले आहेत.