भारताने इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीत कमालीची फटकेबाजी केली आहे. भारतीय संघाने या दुसऱ्या कसोटीत आपला दबदबा राखला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५८७ धावा केल्या, तर इंग्लंडला ४०७ धावांवर सर्वबाद करत १८० धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात भारताची आघाडी ३०० धावांपर्यंत नेण्यात केएल राहुलने मोठी भूमिका बजावली. पण जोश टंगने कमालीच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला.
केएल राहुलने दुसऱ्या डावात भारताला चांगली सुरूवात करून दिली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस राहुलने यशस्वी जैस्वालबरोबर चौकारांची आतिषबाजी करत झटपट धावा केल्या. तर चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला इंग्लंडचे गोलंदाज कमालीची गोलंदाज करत होते. यादरम्यान राहुल सावध पण वेळप्रसंगी कमालीचे कव्हर ड्राईव्ह खेळत अर्धशतक पूर्ण केलं.
केएल राहुलने ३ धावा धावून काढत ७८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. राहुलने २८व्या षटकात आपलं अर्धशतक पूर्ण केलं, तर ३०व्या षटकात तो बाद झाला. जोश टंगच्या ३०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर टंगने त्याला कमालीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं आहे.
टंगने योग्य लेंग्थवर चेंडू टाकला आणि स्विंगही मिळाला, त्यामुळे चेंडू आतल्या दिशेने गेला. राहुल चेंडू खेळण्यासाठी चुकला व थेट चेंडू मिडल स्टम्पवर जाऊन आदळला. मिडल स्टम्पवर चेंडू आदळताच उखडला गेला आणि हवेत गोलांटी खात जमिनीवर पडला. तर बेल्सही हवेत उडाल्या. राहुलच्या विकेटचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.