आयपीएलच्या सातव्या हंगामात सामना निश्चिती (मॅच-फिक्सिंग) प्रकरणात सापडणाऱ्या खेळाडूची गय केली जाणार नाही. त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात येईल, असा इशारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिला आहे.
‘‘मागील वर्षी झालेल्या आयपीएल स्पध्रेतील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणांच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समिती सावध झाले आहेत. आयपीएलच्या सातव्या पर्वातील प्रत्येक सामन्यावर बारकाईने लक्ष असणार आहे. भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा विभागाकडे आलेल्या कोणत्याही तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जाईल. यापैकी कोणतेही आरोप सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीवर आजीवन बंदीची कारवाई होईल,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.