रांची येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मोडला. या सामन्यापूर्वी गप्टिलला कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी ११ धावांची गरज होती. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात त्याने तीन चौकार मारून विराटला मागे सोडले. मात्र, चौथ्या चेंडूवर त्याला संजीवनी मिळाली.

या षटकात त्याने सरळ उंच फटका खेळला. केएल राहुलने मागे धावत असताना हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हातातून निसटला आणि गप्टिल बाद होण्यापासून बचावला. यानंतर त्याने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आणखी एक चौकार मारून विराट कोहलीचा सर्वाधिक टी-२० धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. गप्टिल १५ चेंडूत ३१ धावा करून दीपक चहरचा बळी ठरला.

हेही वाचा – VIDEO : चेंडूचा वेग २१९ kmph..! पाकिस्तानसाठी ‘खलनायक’ ठरलेल्या हसन अलीचा नवा कारनामा; चाहते हैराण!

गप्टिलने आतापर्यंत १११ टी-२० सामन्यांमध्ये ३२४८ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने २ शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत. त्याने १६१ षटकार आणि २८३ चौकार मारले आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने ९५ टी-२० सामन्यांमध्ये ३२२७ धावा केल्या आहेत. त्याने २९ अर्धशतके केली आहेत. विराटने २९० चौकार आणि ९१ षटकार मारले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

  • ३२३१ मार्टिन गप्टिल
  • ३२२७ विराट कोहली</li>
  • ३०८५ रोहित शर्मा
  • २६०८ आरोन फिंच
  • २५७० पॉल स्टर्लिंग