MS Dhoni New Look: हातात पिस्तूल.. पोलिसांचा गणवेश... एमएस धोनीचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल! तुम्ही पाहिला का? MS Dhoni's photo in police uniform is going viral on social media | Loksatta

MS Dhoni New Look: हातात पिस्तूल.. पोलिसांचा गणवेश… एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल! तुम्ही पाहिला का?

MS Dhoni Viral Photo: भारतीय संघाचा कॅप्टन कूल एमएस धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी पोलिसांच्या पोशाखात दिसत आहेत. ज्यावरून चाहते वेगवेगळे तर्क लावत आहेत

MS Dhoni New Look is going viral on social media
एमएस धोनी (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

एमएस धोनी हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होता. त्याने भारताला २ विश्वचषक मिळवून दिले. धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर माही नेहमी त्याच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीने आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. मात्र, आता एमएस धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे.

गुरुवारी एका जाहिरातीसाठी तो पोलिस अधिकाऱ्याच्या लूकमध्ये दिसला. काही मिनिटांतच त्याचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही चाहत्यांसाठी, त्याने रोहित शेट्टीच्या चित्रपटांची फक्त या लूकने आठवण करून दिली आहे.

धोनी पोलीसाच्या वेशात पाहून चाहते पडले विचारात –

सोशल मीडियावर धोनीचा फोटो पाहताच तो व्हायरल झाला आहे. एका जनजागृती कार्यक्रमाशी संबंधित जाहिरातीसाठी त्याने हे शूट केल्याचे सांगण्यात येत आहे. तरी चाहते त्याला रोहित शेट्टीचा पुढचा चित्रपट करण्याचा सल्ला देत आहेत.

काही चाहते म्हणत आहेत की, कदाचित धोनीचा हा लूक आयपीएल २०२३ च्या आधी त्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायझीच्या जाहिरातीसाठी असेल. मात्र, हा लूक कोणत्या जाहिरातीसाठी आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आयपीएल २०२३ मध्ये सीएसकेचे नेतृत्व करणार आहे –

क्रिकेटच्या मैदानात धोनी आयपीएल २०२३ मधून पुनरागमन करत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, धोनीची ही शेवटची आयपीएल आहे. त्यानंतर तो खेळाडू म्हणून संघात सामील होणार नसून मेंटॉर किंवा अन्य कोणत्या तरी भूमिकेत दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने आतापर्यंत एकूण 4 आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 20:57 IST
Next Story
Ranji Trophy: “आदर्श ठेवण्याचा हेतू होता…” रणजी ट्रॉफीमध्ये मोडलेल्या मनगटाने केलेल्या बॅंटिंगवर हनुमा विहारीचा खुलासा