Mumbai Indians buy five players including Shabnim Ismail : महिला प्रीमियर लीग २०२४ साठी मुंबईत लिलाव आयोजित करण्यात आला होता. मुंबई संघाने लिलावापूर्वी ५ जुन्या खेळाडूंना करारमुक्त केले होते. आता डब्ल्यूपीएल २०२४ हंगामासाठी लिलावात ५ नवीन खेळाडू खरेदी केले आहेत. त्यामुळे या संघातील खेळाडूंची संख्या आता १८ सदस्यांपर्यंत वाढली आहे. या मोसमात मुंबईने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलला सर्वात महागात विकत घेतले. त्याचबरोबर चार अनकॅप्ड खेळाडूला खरेदी केले.

मुंबई संघाने २०२३ च्या मोसमासाठी १८ खेळाडूंचाही आपल्या संघात समावेश केला होता. यावेळीही त्यांच्या संघात तेवढ्याच खेळाडूंचा समावेश आहे. या मोसमात मुंबईने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलला सर्वात महागात विकत घेतले. गेल्या हंगामातील चॅम्पियन संघाने या लिलावात अनकॅप्ड खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांनी पाच पैकी चार अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केले. मुंबईच्या पर्समध्ये आता ४५ लाख रुपये शिल्लक आहेत.

Mumbai Ranji Team won Irani Cup 2024
२७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Colours of Navratri 2024 mumbai local train yellow colour video
Colours of Navratri 2024 : मुंबई लोकल रेल्वेस्टेशनवर पिवळा रंगाने वेधले सर्वांचे लक्ष, नवरात्री ट्रेंडची महिलांमध्ये क्रेझ
Ajay Jadeja big statement on Hardik Pandya ahead IPL 2025 Mega Auction
IPL 2025 : ‘हार्दिकला रिलीज करुन ‘या’ तीन खेळाडूंना रिटेन करा…’; अजय जडेजाचा मुंबई इंडियन्सला सल्ला
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
Shaqkere Parris Hits 124 meter monster six video viral
CPL 2024 : शक्केरे पॅरिसने ठोकला १२४ मीटरचा गगनचुंबी षटकार, IPL मधील ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची केली बरोबरी
Jasprit Bumrah Video gone viral in which he is angrily telling Mumbai Indians that he is a fast bowler
Jasprit Bumrah : ‘मी मीडियम पेसर नाही, फास्ट बॉलर’; मुंबई इंडियन्सच्या पोस्टने बुमराह भडकला, VIDEO व्हायरल
Paris Paralympics 2024 India Medal Tally in Marathi
Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते

मुंबई इंडियन्सने ५ खेळाडूंना खरेदी केले –

मुंबईचा संघ जेव्हा या लिलावात उतरला, तेव्हा त्यांच्या पर्समध्ये २.१ कोटी रुपये होते. त्यांनी अतिशय काटेकोरपणे खेळाडूंची निवड केली आणि ५ खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला. या संघाने ३५ वर्षीय दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलला सर्वात महागड्या किमतीत खरेदी केले. मुंबई संघाने तिला खरेदी करण्यासाठी एक कोटी २० लाख रुपये खर्च केले. त्याचबरोबर मुंबईने संजीवन संजनाला १५ लाख रुपयांना तर फातिमा जाफरला १० लाख रुपयांना विकत घेतले. याशिवाय मुंबई संघाने अमनदीप कौर आणि कृतिना बालकृष्णन यांना १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

हेही वााचा – WPL 2024 Auction : ॲनाबेल सदरलँडसाठी दिल्ली कॅपिटल्सने खिसा रिकामा केला, अष्टपैलू खेळाडूसाठी मोजले ‘इतके’ कोटी

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने खरेदी केलेले खेळाडू –

शबनिम इस्माईल – एक कोटी २० लाख
संजीवन संजना- १५ लाख
फातिमा जाफर- १० लाख
अमनदीप कौर- १० लाख
कृतिना बालकृष्णन- १० लाख

डब्ल्यूपीएल २०२४ च्या हंगामासाठी मुंबई संघातील परदेशी खेळाडू –

हेली मॅथ्यूज
अमेलिया केर
चोले ट्रायॉन
शबनिम इस्माईल
निव्वळ सायबर
इसाबेल वँग

हेही वाचा – WPL 2024 Auction : काशवी गौतम ठरली सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू, गुजरात जायंट्सने लावली करोडोंची बोली

मुंबई इंडियन्सचा १८ सदस्यीय संघ –

अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माईल, अमनदीप कौर, संजीवन संजना, फातिमा जाफर, कृतिना बालकृष्णन.