Yuzvendra Chahal on R. Ashwin: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने रविचंद्रन अश्विनबद्दल सोशल मीडियावर एक ट्वीट केले होते, जे आता व्हायरल होत आहे. वास्तविक, अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि एकूण ३ विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने दुसरा सामना ९९ धावांनी जिंकला आणि २-० अशी आघाडीही घेतली. अश्विनच्या या कामगिरीबद्दल चहलने सूचक विधान केले आहे. काय लिहिले आहे, ते जाणून घेऊया.

आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, ज्यात मार्नस लाबुशेन, डेव्हिड वॉर्नर आणि जोश इंग्लिशसारखे मोठे खेळाडू होते. यानंतर यूजी चहलने त्याच्या वैयक्तिक ट्वीटर अकाऊंटवर अश्विनबद्दल केले आहे. त्याने लिहिले की, “रविचंद्रन अश्विन फक्त हे नावच पुरेसे आहे.” त्यानंतर चहलची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

युजी चहलला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळाले नाही

भारतीय स्टार यूजी चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे आणि त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीही निवड झाली नाही. याशिवाय २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही त्याला दुर्लक्षित करण्यात आले आहे. मात्र, आर. अश्विन अजूनही विश्वचषक संघाचा भाग होऊ शकतो. त्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत असून, खेळाडू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “फक्त तोच संघ वर्ल्डकप जिंकेल जो…”, भारताच्या शानदार कामगिरीवर मायकेल वॉनचे आश्चर्यचकित करणारे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या वन डेत रोहित-विराट आणि हार्दिक पुनरागमन करतील

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यांमध्ये के.एल. राहुलकडे कर्णधारपद सोपवले होते. राहुलच्या नेतृत्वाखाली पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय संपादन केला. या काळात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत पुनरागमन करतील. या तिघांच्या आगमनानंतर प्लेइंग-११मध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. शुबमन गिल आणि शार्दुल ठाकूर या दोन्ही खेळाडूंना शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील भारताचा शेवटचा सामना राजकोट येथे २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.