scorecardresearch

Premium

गौतम गंभीरने त्याचा आवडता बॅटिंग पार्टनर सेहवाग, तेंडुलकर नसून ‘या’ खेळाडूचे घेतले नाव; म्हणाला,“लोकांना वाटते की…”

Gautam Gambhir: माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा आवडता फलंदाज साथीदार म्हणून माजी कर्णधाराचे नाव घेतले आहे. तो म्हणाला की, लोकांना वाटते की त्याचा आवडता जोडीदार सेहवाग होता, पण तसे नाही.

Gautam Gambhir told MS Dhoni his favorite batting partner said People think that it will be Sehwag
गौतम गंभीरने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा आवडता फलंदाज साथीदार म्हणून माजी कर्णधाराचे नाव घेतले आहे.

Gautam Gambhir on Best Batting Partner: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील त्याच्या आवडत्या फलंदाज जोडीदाराचे नाव सांगितले आहे. हा वीरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडुलकर नसून टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी आहे. गंभीर म्हणाला की, “लोकांना वाटते की वीरेंद्र सेहवाग त्याचा आवडता फलंदाज साथीदार होता, पण तसे नाही. महेंद्रसिंग धोनीबरोबर फलंदाजी करताना, विशेषत: झटपट क्रिकेटमध्ये तो नेहमीच आनंद घेत असे. २०११च्या विश्वचषकामधील अंतिम सामन्यात गंभीर आणि धोनीने १०९ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली होती. या भागीदारीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्ध विजेतेपद पटकावले, ज्यामध्ये गौतम गंभीरने ९७ धावा केल्या आणि धोनीने नाबाद ९१ धावा केल्या.

स्पोर्ट्सकीडा वर बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “माझा आवडता क्रिकेट साथीदार एम.एस. धोनी होता. लोकांना वाटतं की माझा आवडता फलंदाजी साथीदार वीरेंद्र सेहवाग होता, पण खरं तर मला धोनीबरोबर खेळायला जास्त आवडलं, विशेषत: टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये. आम्ही एकत्र मिळून अनेक मोठ्या भागीदारी केल्या आहेत.” अनेकदा गौतम गंभीरवर धोनीविरोधात बोलल्याचा आरोप होतो, मात्र यावेळी गंभीरने एम.एस. धोनीला आपला आवडता फलंदाजी साथीदार म्हणत सगळ्यांना गप्प केले आहे. तो म्हणाला, “मी धोनीबद्दल नक्कीच बोलतो, पण मी कधी त्याच्यावर रागावलेलो नाही.”

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
performance of fast bowlers play important role in victory against england shubman gill
वेगवान गोलंदाजांची कामगिरी निर्णायक; भारतीय फलंदाज शुभमन गिलचे वक्तव्य
it was my dream to play for india in front of my father says sarfaraz khan
वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद! भारताचा फलंदाज सर्फराज खानची प्रतिक्रिया

हेही वाचा: PAK vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी उमर गुल पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक, सईद अजमलला मिळाली ‘ही’ जबाबदारी

गौतम गंभीरने एम.एस. धोनीचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने अनेकदा सांगितले होते की, “एम.एस. धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघासाठी आपल्या धावा पणाला लावल्या होत्या. जर महेद्रसिंग धोनीने वरच्या फळीत फलंदाजी केली असती तर त्याने अनेक विक्रम केले असते.” पुढे गंभीर असे म्हणाला होता की, “जर एमएसने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर मला खात्री आहे की त्याने अनेक एकदिवसीय विक्रम मोडले असते,” तो त्या मुलाखतीत बोलताना म्हणाला.

हेही वाचा: ICC New Rule: आयसीसीने घेतला मोठा निर्णय! आता गोलंदाजांसाठीही टाईम आऊट; टी-२० मध्ये स्टॉप क्लॉकचा नवा नियम

माजी सलामीवीर फलंदाज गंभीर पुढे म्हणाला, “लोक नेहमी एम.एस. धोनी आणि कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल बोलतात, जे अगदी खरे आहे, परंतु मला वाटते की कर्णधारपदामुळे त्याने त्याच्यातील फलंदाजाचा त्याग केला. नाहीतर तो फलंदाजीत खूप काही साध्य करू शकला असता, जे त्याने केले नाही. जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा असेच होते, कारण त्यावेळी तुम्ही संघाला पुढे नेत असता आणि स्वतःला विसरता. हेच रोहित शर्माने विश्वचषक २०२३मध्ये केले.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Not only this gautam gambhir told ms dhoni his favorite batting partner there is a big reason behind this avw

First published on: 22-11-2023 at 11:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×