न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्फराज अहमद पाकिस्तानचा हिरो म्हणून उदयास आला. सरफराज अहमदने शानदार पुनरागमन करताना पाकिस्तान संघासाठी कठीण परिस्थितीत धावा केल्या. या महत्त्वपूर्ण धावांसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले. आता सरफराज अहमदशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो सामना विसरून आपल्या पत्नीकडे बघताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान ही मजेशीर घटना घडली. किवी अष्टपैलू डॅरिल मिशेल गोलंदाजी करायला येताच, सरफराज अहमदला खेळाच्या मैदानाच्या विरुद्ध दिशेने चालताना पाहून वेगवान गोलंदाजाने आपली गोलंदाजी थांबवली. कारण त्याला सरफराज काय करतोय हे जाणून घ्यावे लागले.

सरफराज आधीच खेळपट्टीच्या बाहेर बाजूच्या दिशेने उभा होता, सरफराज स्टेडियममध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर दिसत असलेल्या आपल्या पत्नीकडे पाहत होता. गोलंदाज मिशेल वाटेत थांबला आणि हा ड्रामा झाला, तेव्हा सरफराजचा बॅटिंग पार्टनर सौद शकील सैफी भाईला काय झालं भैया, असे विचारताना दिसला.

हेही वाचा – ICC Rankings: वनडे क्रमवारीत विराट कोहलीची मोठी झेप; ‘या’ दोन भारतीयांनाही झाला फायदा

खरं तर, कॅमेरा पत्नीकडे झूम करताच सरफराज आपली फलंदाजी विसरला आणि तिला पाहू लागला. क्षणभर सरफराज विसरला की त्याला सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चार डावांत ८३.७५ च्या सरासरीने ३३५ धावा करून संपवली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs nz test sarfraz ahmed leaving batting in a live match and watching his wife is video going viral vbm
First published on: 11-01-2023 at 16:13 IST