दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जगभरातले क्रिकेटपटू भारतात येऊन ठाण मांडतात. आयपीएलच्या सामन्यांमध्ये विविध संघांसाठी खेळतात. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी आयपीएलची दारं बंद आहेत. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी समाधानकारक नाही. पाकिस्तान संघाच्या सर्वसाधारण कामगिरीवर माजी खेळाडू, तज्ज्ञ तसंच चाहते टीका करत आहेत. यानिमित्ताने हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तानच्या एकाही खेळाडूकडे भारतात खेळण्याचा अनुभव नाही.

२००८ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानचे ११ खेळाडू सहभागी झाले होते. पण त्यानंतर काही महिन्यात मुंबई शहरावर भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. १६६ जणांनी या हल्ल्यात जीव गमावला तर आठशेहून अधिकजण जखमी झाले. जवळपास तीन दिवस या हल्ल्याने मुंबईकरांना वेठीस धरलं. या हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, एनएसजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह एएसआय तुकाराम ओंबळे यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात आहे आणि तिथूनच या हल्ल्याचा कट रचला गेला हे स्पष्ट झालं. त्यामुळे पाकिस्तानसाठी भारताची दारं कायमची बंद झाली. भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात नाही. पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही. फक्त आयसीसी आयोजित स्पर्धांमध्ये म्हणजेच वनडे वर्ल्डकप, ट्वेन्टी२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स लीग, आशिया चषक यामध्येच दोन्ही संघ आमनेसामने येतात.

Indian domestic cricketer salary
BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन
Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण

पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलेले युनिस खान, मिसबाह उल हक हे खेळाडू होते. जगातल्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये नोंद होणारे शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिक खेळले होते.

आणखी वाचा: चेन्नईच्या चाहत्यांनी पाकिस्तानला जेव्हा स्टँडिंग ओव्हेशन दिलं

क्रिकेटविश्वात सर्वाधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सच्या यादीत समाविष्ट शोएब अख्तर सहभागी झाला होता. शैलीदार बॅट्समन सलमान बट्ट आणि उंचपुरा उमर गुल त्याचे कोलकाता संघातले सहकारी होते. राजस्थान रॉयल्सने युनिस खानच्या बरोबरीने कामरान अकमल आणि सोहेल तन्वीर यांच्यावर विश्वास ठेवला. सोहेलने या विश्वासाला सार्थ ठरत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजाला देण्यात येणारी परपल कॅप पटकावली होती. आयपीएलमधील सर्वोत्तम बॉलिंग आकडे हा मान सोहेलच्या नावावर अकरा वर्षं होता.

जगभराल्या बॅट्समनची भंबेरी उडवणारा मोहम्मद आसिफ दिल्लीकडून खेळला होता. गेल्या दशकभरात ट्वेन्टी-20 तसंच वनडेत सातत्याने चांगली कामगिरी करणारा मोहम्मद हफीझ कोलकाता संघाचा भाग होता.

राहुल द्रविड, मार्क बाऊचर, जॅक कॅलिस, डेल स्टेन यांच्या बरोबरीने मिसबाह उल हक बेंगळुरू संघाचा भाग होता. थोडक्यात पाकिस्तानचे तत्कालीन सगळे प्रमुख खेळाडू 2008च्या आयपीएल स्पर्धेत विविध संघांकडून खेळले. मुंबई, चेन्नई आणि पंजाब या संघांनी पाकिस्तानी खेळाडूंना समाविष्ट केलं नाही.

वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघातील एकाही खेळाडूला भारतात खेळायचा अनुभव नाही. आयपीएलच्या निमित्ताने विदेशी खेळाडू भारतात येतात. दीड महिना देशभर खेळतात. भारतीय खेळाडूंशी त्यांची मैत्री होते. प्रचंड पाठिंब्यात खेळायचा सराव होतो. यापैकी काहीही पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनुभवलेलं नाही. पाकिस्तानचे खेळाडू पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतात. याव्यतिरिक्त जगभरात होणाऱ्या अन्य लीग स्पर्धेतही खेळतात पण आयपीएलसंदर्भात त्यांची पाटी कोरी आहे.

आणखी वाचा: बॅटवर ओम, मंदिराला भेट, ‘जय श्रीराम-जय माता दी’ म्हणणारा दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज तुम्हाला माहितेय का?

भारताने पाकिस्तानमध्ये शेवटची टेस्ट 2006 मध्ये तर शेवटची वनडे 2008 मध्ये खेळली आहे. पाकिस्तानचा संघ भारतात शेवटची टेस्ट 2007 मध्ये खेळला आहे तर पाकिस्तानचा संघ वनडे सीरिजसाठी 2013 मध्ये भारतात आला होता.

अफगाणिस्तानचे पाच खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतात. रशीद खान हा आयपीएलच्या चेहऱ्यांपैकी एक आहे. अफलातून फिरकी, उपयुक्त फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण यामुळे रशीद खान हा हुकूमी एक्का मानला जातो. सनरायझर्स हैदराबाद आणि आता गुजरात टायटन्स अशा दोन्ही संघांसाठी रशीदने आपली ताकद सिद्ध केली आहे. मुजीब किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळतो तर मोहम्मद नबी सनरायझर्स हैदराबादसाठी. नूर अहमदचं नैपुण्य गुजरात टायटन्सने टिपलं आणि त्याला ताफ्यात समाविष्ट केलं.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाचवेळा जगज्जेतेपद नावावर केलं आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही ते जेतेपदाचे दावेदार आहेत. ऑस्ट्रेलियाचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. डेव्हिड वॉर्नरचे भारतात हजारो चाहते आहेत. वॉर्नर अनेक वर्ष सनरायझर्स हैदराबादसाठी खेळायचा. वॉर्नर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. पुष्पा सिनेमातील लकब करुन दाखवतो. भारतीय गाण्यांवर रील्स करतो. चाहत्यांशी संवाद साधतो. भारतीय संस्कृती त्याने आपलीशी केली आहे. वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळत असला तरी हैदराबादबद्दल त्याच्या मनात जिव्हाळा आहे.

बांगलादेशचा शकीब उल हसन, मुस्ताफिझूर रहमान आणि लिट्टन दास आयपीएल स्पर्धेत खेळतात. मुस्ताफिझूरचे बॅक ऑफ द हँड संथ गतीचे यॉर्कर खेळणं प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरतं. शकीब आणि लिट्टन केकेआर अर्थात कोलकातासाठी खेळतात.

आणखी वाचा: डेव्हॉन कॉनवे-चांगल्या संधीच्या शोधात त्याने घर विकलं, गाडी विकली, देशही सोडला

इंग्लंडच्या बोर्डाने सुरुवातीला त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. त्या काळात केव्हिन पीटरसन आणि अँड्यू फ्लिनटॉफ यांनी आवाज उठवला. काही वर्षानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा पवित्रा बदलला. आता त्यांचे बहुतांश खेळाडू आयपीएलमध्ये नियमित खेळतात. जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली हे त्यांच्या संघांचे स्टार खेळाडू आहेत.

न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएल संघांसाठी अनेक वर्ष खेळत आहेत. केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे हे आपापल्या संघांसाठी निर्णायक भूमिका बजावतात. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत छाप उमटवली आहे. एबी डीव्हिलियर्सचे लाखो चाहते भारतात आहेत. एडन मारक्रम सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्वच करतो. क्विंटन डी कॉक हा मुंबई, हैदराबाद, लखनौ संघांचा महत्त्वाचा खेळाडू आहे. डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासन, कागिसो रबाडा हे लोकप्रिय आणि सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी आहेत.

श्रीलंकेच्या वर्ल्डकप संघापैकी पाच जण आयपीएलमध्ये खेळतात. महीश तीक्षणा हा धोनीच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वातच मथीशा पथिराणाचा खेळ बहरला आहे. दासून शनका गुजरात टायटन्सकडून खेळतो.