Pakistan In World Cup Semi Finals Point Table: विश्वचषक २०२३ मध्ये सलग पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाची आज खरी परीक्षा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे आव्हान स्वीकारून बाबर आझमच्या संघाला आपली अपयशी स्ट्राईक मोडण्याची संधी आहे. खरंतर आयसीसी स्पर्धांमधील पाकिस्तानची खेळी पाहिली तर आश्चर्यकारकपणे, अत्यंत वाईट सुरुवात आणि मग शेवटाकडे वळताना अनपेक्षित भरारी असा त्यांचा खेळ दिसून आला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया व भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तानी संघ शेवटच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी अंतिम फेरीत धडक देण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नेमकं यासाठी काय व कसं समीकरण जुळून यावं लागेल हे पाहूया..

पॉइंट टेबलवर पाकिस्तान कुठे आहे? (World Cup 2023 Point Table)

पाकिस्तानी संघाने नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून विश्वचषकातील स्पर्धेची प्रभावी सुरुवात केली मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम व संघ टिकला नाही. मग एक एक करून ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानने सुद्धा पाकिस्ताने संघाला पॉईंट टेबलमध्ये खालच्या बाजूस ढकलले. पराभवाच्या हॅट्ट्रिकमुळे पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये श्रीलंकेच्या खाली सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेने गुरुवारी गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून पाचव्या स्थानी आपले नाव कोरले आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानचे उर्वरित वेळापत्रक कसे आहे?

पाकिस्तानचा सामना शुक्रवारी चेन्नईत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल, त्यानंतर ३१ ऑक्टोबरला कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध सामना होईल. त्यानंतर पाकिस्तानचे लीग टप्प्यात आणखी दोन कठीण सामने आहेत. ४ नोव्हेंबर रोजी २०१९ च्या उपविजेत्या न्यूझीलंड आणि ११ नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानला आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे.

पाकिस्तान विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र कसा होऊ शकतो?

पाकिस्तानचे लीग स्टेजमध्ये चार सामने बाकी आहेत, यामध्ये सर्व सामन्यांमध्ये जरी पाकिस्तानने विजय खेचून आणला तरी संघाला जास्तीत जास्त १२ गुण मिळतील, जे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पुरेसे नाहीत. पण उर्वरित नऊ संघ लीग टप्प्यात काय कामगिरी करतायत यानुसार पाकिस्तानचे विश्वचषकातील भविष्य ठरू शकते. पाकिस्तानचा नेट रन रेट (-0.400) असल्याने श्रीलंका (-0.205) आणि अफगाणिस्तान (-0.969) पेक्षा पाक संघ पुढे आहे.

हे ही वाचा<< “मी कट्टर सनातनी पण आफ्रिदीने मला त्रास देऊन..”, माजी खेळाडू दानिश कनेरियाची संतप्त टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आहेत. पाकिस्तान सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरले आणि श्रीलंकेविरुद्ध जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचे पाकिस्तानपेक्षा दोन गुण जास्त आहेत . आता जर एखाद्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट कोलमडला तरच बाबर आझमच्या संघाला पुढे जाण्याची संधी मिळू शकते.