IND vs WI 2nd ODI: सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. त्याचवेळी, या मालिकेतील दुसरा सामना २९ जुलै रोजी किंग्स्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी टीमचा खेळाडू वेस्ट इंडिजच्या बीचवर मस्ती करताना दिसला आहे. त्यात हार्दिक पांड्या आघाडीवर होता.

अष्टपैलू हार्दिक पांड्या मैदानावरच नाही तर सोशल मीडियावर सुद्धा तेवढाच अ‍ॅक्टिव असतो. जिथे पांड्या त्याच्या चाहत्यांसाठी वेगवगळ्या पोस्ट शेअर करत असतो. सध्या हार्दिक वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, मात्र यादरम्यानही तो सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहे आणि त्याने काही छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर केली आहेत.

विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तो वेस्ट इंडिजच्या बीचवर फुटबॉल खेळताना दिसत आहे. याबरोबरच या फोटोंमध्ये पांड्याने पोस्टिक फूडचा फोटोही शेअर केला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच त्याने त्याचे फोटो देखील शेअर केले आहेत त्यामध्ये त्याचे फिट शरीर दाखवले आहे. याबरोबरचं त्याने गळ्यात पांड्या लॉकेटही घातले आहे.

पहिल्या ‘वन डे’त तो फॉर्मात दिसला नाही

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २७ जुलै रोजी खेळला गेला होता. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघ ११४ धावांवर सर्वबाद झाला. मात्र एवढे असूनही हार्दिक पांड्याला या सामन्यात फारशी कमाल दाखवता आली नाही. त्याने गोलंदाजीत एक विकेट घेतली आणि फलंदाजीत केवळ पाच धावा करून तो धावबाद झाला.

हार्दिककडून संघाला खूप आशा आहेत

विशेष म्हणजे २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ सतत क्रिकेट खेळत आहे. जेणेकरून विश्वचषकासाठी संघाची योग्य निवड करता येईल. अशा परिस्थितीत हार्दिककडून भारताला खूप आशा आहेत की, त्याने फॉर्ममध्ये परतावे आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करून विश्वचषकासाठी आपली दावेदारी सादर करावी.

हेही वाचा: Sanjay Manjrekar: “त्याचे फुटवर्क हे फारसे…”, स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीवर माजी खेळाडू मांजरेकरांचे मोठे विधान

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघांचा संघ

भारतीय क्रिकेट संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, युजवेंद्र चहल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेस्ट इंडिज संघ: शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), अलिक अथानाज, यानिक कारिया, केसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जॅडन सील्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस

अतिरिक्त खेळाडू: डेनिस बुली, रोस्टन चेस, मॅकेनी क्लार्क, क्वाम हॉज, जैर मॅककॅलिस्टर, ओबेद मॅककॉय, केविन विकहॅम