World Cup 2023, India vs Australia Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे खेळला जात आहे. स्टेडियम भारतीय चाहत्यांनी खचाखच भरले आहे. ऑस्ट्रेलियन चाहतेही मैदानात दिसत आहेत. दरम्यान, प्रेक्षक गॅलरीतही एक खास चेहरा पाहायला मिळाला. ही खास व्यक्ती दुसरी कोणी नसून ‘जार्व्हो ६९’ आहे, ज्याने भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान मैदानात प्रचंड गोंधळ घातला होता. ‘जार्व्हो ६९’ चा प्रँक इथेही सुरू आहे. या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये विराट कोहली जार्व्होला समजावताना दिसला. एवढेच नाही तर मैदानात उपस्थित सुरक्षा कर्मचारीही त्यांची समजूत काढताना दिसले. तो यष्टिरक्षक केएल राहुलसमोर आल्यावर राहुलने त्याला बाहेरचा जाण्यास सांगितले. याआधी भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान जार्व्हो अनेकदा दिसला होता.

भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान घातला होता बराच गोधळ –

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ‘जार्व्हो ६९’ कोण आहे? तर ही तीच व्यक्ती आहे जी आपला जीव धोक्यात घालूनही भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेदरम्यान पुन्हा पुन्हा भारतीय जर्सी घालून मैदानात उतरत असे. ही घटना एक-दोनदा नाही तर अनेक वेळा घडली आहे. ‘जार्व्हो ६९’च्या या कृतीमुळे सामना अनेकवेळा थांबवावा लागला आहे.

हेही वाचा – IND vs AUS, World Cup 2023: विराट कोहलीने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेत विश्वचषकात रचला इतिहास, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जार्व्हो ६९’ कोण आहे?

‘जार्व्हो ६९’हा क्रिकेटचा चाहता आहे. ‘जार्व्हो ६९’ हा भारतीय क्रिकेटपटू नाही किंवा त्याचा क्रिकेटशी काही संबंध नाही. त्याऐवजी, तो एक सिरीयल प्रँकस्टर आहे, जो इंग्लंडमधील केंट काउंटीच्या ग्रेव्हसेंड शहराचा रहिवासी आहे. ‘डॅनियल जार्विस’ला त्याच्या खऱ्या नावाने क्वचितच कोणी ओळखत असेल. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्या सामन्यात कोणालाही न सांगता मैदानात उतरल्यावर डॅनियल पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. दरम्यान, त्याने टीम इंडियाची टेस्ट जर्सी घातली होती. त्यावेळी, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने बीसीसीआयचा लोगो दाखवत त्यांच्यासोबत वाद घातला होता.