Coaching Beyond: 'पंत ऐकत नव्हता, जे सांगितले जायचे ते करत नव्हता', माजी प्रशिक्षकाने केला खुलासा R Sridhar revealed that Rishabh Pant was not listening to some of his things | Loksatta

Coaching Beyond: ‘पंत ऐकत नव्हता, जे सांगितले जायचे ते करत नसे’, माजी प्रशिक्षकाने केला खुलासा

R Sridhar on Rishabh Pant:भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा कार अपघाता झाल्यानंतर क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरने ऋषभबद्दल एक खुलासा केला. आहे. हा खुलासा त्याने आपल्या पुस्तकात केला आहे.

Rishabh Pant was not listening to some of his things
ऋषभ पंत (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. या कारणास्तव, पंत अलीकडे वाईट अवस्थेतून जात असतानाही संघ व्यवस्थापनाने त्याला भरपूर साथ दिली. पंतची कामगिरी मर्यादित षटकांमध्ये नक्कीच चांगली झाली नाही. पण कसोटीत त्याची कामगिरी अप्रतिम होती, परंतु भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.के. श्रीधरने पंतवर नाराज असल्याचं म्हटलं आहे.

श्रीधरने नुकतेच त्याचे ‘कोचिंग बियॉन्ड’ हे पुस्तक लाँच केले आहे. ज्यामध्ये त्याने टीम इंडियाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात त्याने सांगितले की, जेव्हा तो पंतला काही सल्ला देत असे, तेव्हा त्याने त्याला गांभीर्याने घेतले नाही. डिसेंबरच्या अखेरीस त्याचा कार अपघात झाला. ज्यामध्ये तो जखमी झाला आणि बराच काळ मैदानापासून दूर आहे.

ऋषभ पंत ऐकत नव्हते –

श्रीधरने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, जेव्हा तो पंतला यष्टिरक्षण सुधारण्यासाठी काही सल्ले देत असे, तेव्हा त्याने तो ऐकत नव्हता. त्याने लिहिले, “काही इनपुट्स होते जे त्याने अजिबात स्वीकारले नाहीत. कारण त्याचा त्याच्या खेळावर विश्वास होता. ज्याने त्याला या पातळीवर आणले. अनेक वेळा मला त्याचे ऐकावे लागले. मला वेड लागायचे. तो हट्टी होता. पण रागावणे किंवा नाराज होणे कोणालाच मदत करत नाही. पंतने वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करण्यासाठी, मला अनेक मार्ग मला शोधावे लागले. हे बदल त्याच्यासाठी फायदेशीर ठरले की नाही हे फक्त तोच सांगू शकतो.”

हेही वाचा – IND vs AUS Test Series: कसोटी मालिकेसाठी विराट कोहली आणि केएल राहुल स्टायलिश शैलीत नागपुरात दाखल, पाहा VIDEO

सल्ला देणे बंद केले होते –

श्रीधर म्हणाले की, एक वेळ अशी आली होती की त्यांनी पंतला कोणताही सल्ला देणे बंद केले होते. त्यानी लिहिले, “आम्ही सरावात बराच वेळ एकत्र घालवायचो, सहसा मी आणि पंत होतो. मी पुन्हा ठरवले की आता मी कडक होणार. मी त्याला सल्ला आणि सूचना देणे बंद केले. जेव्हा तो माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत असे, तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पंत हुशार आहे आणि म्हणून जेव्हा तो काही चूक करतो, तेव्हा तो सुधारण्यासाठी जास्त वेळ घेत नाही.”

हेही वाचा – BBL 2023: बिग बॅश लीगमध्ये घडली विचित्र घटना; थर्ड अंपायरच्या निर्णयाने क्रिकेटविश्वला बसला धक्का, पाहा VIDEO

श्रीधरने सांगितले की, जेव्हा पंतला त्याच्या यष्टिरक्षणात अडचणी येत होत्या आणि त्यात सुधारणा होत नव्हती, तेव्हा तो पुन्हा त्याच्याकडे आला होता. तो म्हणाला, “काही दिवसांनी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘सर, तुम्ही काही सांगत नाही. प्लीज मला सांगा की मी काय करू.’ मग मी म्हणालो की तू तुझ्या हाताचे न ऐकता डोक्याचे ऐक. त्यानंतर त्याने माझी ऐकले आणि डोक्याने शरीर हलवत हाताने चेंडू पकडायचा.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:07 IST
Next Story
Shubman Gill: इशान किशनने शतकवीर शुबमन गिलला गमतीत मारली कानशिलात! समोर बसलेला युजवेंद्र चहल पाहत राहिला, मजेशीर Video व्हायरल