DC Vs UP, WPL 2023 Viral Video : कर्णधार मेग लॅनिंगने ठोकलेल्या दमदार अर्धशतकी खेळीमुळं दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करून ४ बाद २०११ धावांचा डोंगर रचला. महिला प्रीमियर लीगच्या टी २० क्रिकेट टूर्नामेंटमध्ये एकाहून एक जबरदस्त सामने पाहायला मिळत आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स यांच्यातही रंगदार सामना झाला. पण ११ व्या षटकात एक प्रेक्षकांची धडकी भरणवारं दृष्य पाहायला मिळालं. या षटकात शिखा पांडेच्या पहिल्या चेंडूवर दिप्ती शर्माने लॉंग ऑनवर मोठा फटका मारला. पण मैदानात चेंडूवर टक लावून बसलेल्या राधा यादवने हवेत उडी मारून अप्रतिम झेल घेतला.

दिल्ली कॅपिटल्सने २१२ धावांचं आव्हान दिल्यानंतर युपी वॉरियर्सची पलटण मैदानात उतरली. पण दिल्लीप्रमाणे युपीच्या संघाला सुरुवातीच्या षटकांत मोठी धावसंख्या करता आली नाही. सलामीवीर हॅली आणि श्वेता सेहरावत यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी फक्त २९ धावा केल्या. किरण नवगिरेने अवघ्या दोन धावाच केल्या. दिल्लीने दिलेलं २१२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या युपी वॉरियर्स संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार एलिसा हिली आणि श्वेता सेहरावत यांनी २९ धावांची भागिदारी केली. एलिसाने १७ चेंडूत २४ धावा केल्या. तसंच मागच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारी किरण नवगिरे या सामन्यात मात्र अवघ्या २ धावांवर बाद झाली. दिप्ती शर्मानेही गोलंदाजांच्या दबावात खेळून २० चेंडूत फक्त १२ धावा केल्या.

नक्की वाचा – रोहित शर्माला मोठा धक्का, ICC टेस्ट रॅंकिंगमध्ये या खेळाडूंची ‘विराट’झेप, पण कोहली पिछाडीवर

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देविका वैद्यने ताहिला मॅकग्राची साथ देत २३ धावा केल्या. पण चुकीचा फटका मारून देविकाही तंबूत परतली. युपी वॉरियर्सचा संघ अडचणीत असताना मात्र ताहिला मॅकग्राने झुंजार खेळी केली. ५० चेंडूत ९० धावांची धडाकेबाज खेळून करून ताहिलाने आपल्या संघाला विजयाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. ११ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ताहिलाने ९० धावांची खेळी साकारली. पण ताहिलाची एकाकी झुंज अखेर अपयशी ठरली आणि दिल्लीसंघाने युपी वॉरियर्सचा पराभव करून या टुर्नामेंटमध्ये सलग दुसऱ्या विजयाची माळ गळ्यात घातली.