विशाखापट्टणम : राष्ट्रीय संघात निवड व्हायची असेल, तर आधी खेळाडूने खेळायला हवे. त्यानंतर त्याचा निवडीसाठी विचार होतो असे वक्तव्य करताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशान किशनने आधी खेळायला तर, सुरुवात करू देत असे मत मांडले.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून इशान किशनने दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीची मागणी केली होती. तेव्हापासून इशान मैदानार उतरलेला नाही. त्याने रणजी करंडक स्पर्धेतही झारखंडचे प्रतिनिधित्व केलेले नाही.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील विजयानंतर द्रविड यांनी इशानच नाही,तर संघातील यष्टिरक्षकाच्या भूमिकेबद्दल आपली मते स्पष्टपणे मांडली. द्रविडने सांगितले,‘‘प्रत्येकाला परतीचा मार्ग असतो. त्यापेक्षा त्याने तो ठरवायचा असतो. मला केवळ इशानविषयी बोलायचे नाही. पण, इशानला यापूर्वीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मुळात विश्रांतीची मागणी त्याच्याकडून झाली आहे. त्याला वगळण्यात आलेले नाही. आम्ही त्याच्या विनंतीचा आदर केला.’’

हेही वाचा >>>IND vs ENG : अश्विनच्या ५००व्या कसोटी विकेटवरुन गोंधळ, पहिल्यांदा अंपायरने दिले आऊट नंतर बदलला निर्णय

‘‘आता परत कधी यायचे हे त्याने ठरवायचे आहे. परतण्यापूर्वी त्याने किमान क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. त्याची निवड करायची आहे, तेव्हा त्याने या गोष्टींचा विचार करायला हवा. आम्ही त्याच्याशी संवाद साधला. पण, त्याने अजून खेळायला सुरुवात केलेली नाही त्यामुळे निवडीसाठी त्याचा विचार होऊ शकत नाही,’’ असे द्रविड यांनी स्पष्ट केले.

द्रविड यांनी यष्टिरक्षणासाठी पर्याय आहेत. ऋषभ अद्याप तंदुरुस्त नाही. के.एस.भरत, ध्रुव जुरेल असे पर्याय संघ व्यवस्थापनासमोर आहेत. निवड समिती या पर्यायांचा विचार करत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>IND vs ENG Test : रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरतकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा

पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत संधी मिळालेल्या के. एस. भरतच्या कामगिरीबाबत द्रविड यांनी समाधान व्यक्त केले. पण, त्याने फलंदाजी अधिक चांगली करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. त्याच्या फलंदाजीबाबत मी निराश आहे असे म्हणणार नाही. पण, तो अधिक चांगली फलंदाजी करू शकला असता, असे द्रविडने सांगितले.