scorecardresearch

Premium

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा; सर्फराजच्या द्विशतकामुळे मुंबईचा धावांचा डोंगर

सर्फराज आणि रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी २५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

Ranji Trophy Cricket Tournament

युवा सर्फराज खानने साकारलेल्या २७५ धावांच्या मॅरेथॉन द्विशतकी खेळीच्या बळावर ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक (ड-गट) लढतीच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद ५४४ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला.

सर्फराजने १२१ धावसंख्येवरून शुक्रवारी आपल्या डावाला पुढे प्रारंभ करीत सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ३० चौकार आणि सात षटकारांनिशी ४०१ चेंडूंत आपली पावणेतीनशे धावांची खेळी उभारली. मुंबई संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे १२९ धावसंख्येवर बाद झाला. परंतु त्याने भारताच्या कसोटी संघातील आपली दावेदारी मजबूत केली. सर्फराज आणि रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी २५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळेच ३ बाद ४३ धावांवरून मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली.

asian games 2023 india medal tally reach 100
शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!
Ahmedabad Narendra Modi Stadium
सुन्या सुन्या मैफिलीत..;क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या स्वागताला रिकाम्या खुर्च्या
Kuldeep Yadav Brutally Trolled For Going To Bageshwar Dham Dheerendra Shastri Netizens Slam Asia Cup 2023 IND vs PAK Star
“कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका
Rohit Sharma as opener record
IND vs SL: अर्धशतक ठोकताच रोहित शर्माची आणखी एका विक्रमाला गवसणी, ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच सलमीवीर

अनुभवी यष्टिरक्षक आदित्य तरे (२२) आणि शाम्स मुलानी (१२) लवकर बाद झाल्यानंतर सर्फराजला आठव्या क्रमांकावरील तनुष कोटियनची (नाबाद ५०) उत्तम साथ लाभली. या जोडीने सातव्या गडय़ासाठी ११८ धावांची भागीदारी करीत मुंबईला पाचशेचा टप्पा ओलांडून दिला. मग प्रेरक मंकडने पायचीत करीत सर्फराजला त्रिशतकापासून रोखले. उत्तरार्धात सौराष्ट्रने बिनबाद १८ धावा केल्या. सलामीवीर हार्विक देसाई आणि स्नेल पटेल अनुक्रमे ६ आणि ११ धावांवर खेळत होते.

पदार्पणवीर पवनचे दमदार द्विशतक

रोहतक : महाराष्ट्राचा सलामीवीर पवन शहाने रणजी स्पर्धेतील आसामविरुद्धच्या सामन्यात पदार्पणातच द्विशतकी खेळी साकारली. २२ वर्षीय पवनच्या २१९ धावांमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात ४१५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात आसामची दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ८१ अशी धावसंख्या होती. मुकेश चौधरीने रिषव दासला (१४), तर मनोज इंगळेने गोकुळ शर्माला (५) माघारी पाठवले. मात्र, सलामीवीर शुभम मंडल (नाबाद ३४) आणि रियान पराग (नाबाद २६) यांना आसामचा डाव सावरला. तत्पूर्वी, ग-गटातील या सामन्यात दुसऱ्या दिवशी ५ बाद २७८ धावांवरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राचा पहिला डाव ४१५ धावांवर संपुष्टात आला. पवनने ४०१ चेंडूंत २० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१९ धावांची खेळी केली. त्याला दिव्यांग हिंगणेकर (४६) आणि सत्यजीत बच्छाव (५२) यांची तोलामोलाची साथ लाभली. त्यामुळेच महाराष्ट्राला ४०० धावांचा टप्पा पार करता आला. आसामकडून मुख्तार हुसेनने ८८ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई (पहिला डाव) : १५७ षटकांत ७ बाद ५४४ डाव घोषित (सर्फराज खान २७५, अजिंक्य रहाणे १२९, तनुष कोटियन नाबाद ५०; चिराग जानी २/८३)

सौराष्ट्र (पहिला डाव) : ९ षटकांत बिनबाद १८

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranji trophy cricket tournament debutant pawan double century abn

First published on: 19-02-2022 at 01:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×