भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी सोशल मिडियावर एक भन्नाट फोटो पोस्ट केला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर कमेंट्सचा जणू पाऊसच पाडला आहे. इतकेच नव्हे तर शास्त्री यांच्या या फोटोवरील कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. ६१ वर्षीय रवी शास्त्री सध्या आयपीएल २०२४ मध्ये समालोचकाच्या भूमिकेत आहेत.

– quiz

रवी शास्त्रींनी क्रिकेटपटूसहित प्रशिक्षक, समालोचक आणि क्रिकेट तज्ञ अशा विविध भूमिका पार पाडल्या आहेत. रवी शास्त्री यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं तर १९८१ ते १९९२ कालालधीत शास्त्री यांनी ८० कसोटी आणि १५० एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी एकूण ७ हजार आंतरराष्ट्रीय धावा आणि २७२ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या. एक गोलंदाज म्हणून खेळण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांच्या रूपात एक उत्कृष्ट फलंदाजही भारताला मिळाला. शास्त्री ही १९८३ च्या विश्वचषक संघाचाही भाग होते. १९९२ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर शास्त्री यांनी १९९५ मध्ये समालोचक म्हणून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत शास्त्री समालोचकाच्या भूमिकेत आहेत.

रवी शास्त्रींनी पोस्ट केलेला हा फोटो काही वेळातच व्हायरल झाला, पण शास्त्रींनी पोस्ट केलेला हा फोटो जाहिरातीसंबंधित असल्याचे वाटत आहे. तर काहींनी म्हटलं सरांच अकाऊंट हॅक झालंय का, तर शास्त्रींना क्रिकेटचा अनिल कपूर असेही काही जणांनी म्हटले आहे. शास्त्रींच्या या फोटोवर अनेक मीम्सही तयार झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.