Ravichandran Ashwin on Rohit Sharma: रोहित शर्मा हा एक उत्कृष्ट कर्णधार आहेच पण त्याचसोबत एक व्यक्ती म्हणून तो कमाल आहे. राजकोट कसोटीत अश्विनसोबत घडलेल्या प्रसंगावरून याचा प्रत्यय नक्कीच येतो. प्रतिकूल परिस्थितीत रोहितने एक कर्णधार म्हणून ती परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली याबद्दल त्याचे कौतुक अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवरून केले. राजकोट कसोटी सुरू असताना अश्विनची आई घरात अचानक कोसळल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले होते, त्यामुळे अश्विन राजकोट कसोटी अर्ध्यातच सोडून चेन्नईला परतला होता.

एका बाजूला आईला पाहण्याची ओढ आणि दुसऱ्या बाजूला भारतीय संघ अशी दुविधा मनस्थितीत अश्विन होता. हा प्रसंग सांगताना अश्विन म्हणाला, “मी विचारले की आई कशी आहे आणि ती शुद्धीत आहे का? यावर मला डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की तू तिला पाहशील अशा अवस्थेत ती नाही. तेव्हा मी पार खचून गेलो आणि रडू लागलो. मी चेन्नईला जाण्यासाठी फ्लाइट शोधत होतो पण मला ते मिळाले नाही. राजकोट विमानतळ ६ वाजता बंद होते कारण ६ नंतर तिथून एकही फ्लाइट नसते. मला काय करावे हे कळत नव्हते. रोहित (शर्मा) आणि राहुल (द्रविड) भाई माझ्या खोलीत आले आणि रोहितने अक्षरशः मला सांगितलं की आधी विचार करणं थांबव आणि माझ्या कुटुंबासह राहण्यासाठी चेन्नईमध्ये जाण्यास सांगितले. तो माझ्यासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होता.”

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video

रोहितचे हे प्रयत्न पाहून अश्विन थक्क झाला होता. पुढे सांगताना फिरकीपटू म्हणाला “फिजिओ टीममधील कमलेश माझा खूप चांगला मित्र आहे. रोहितने त्याला माझ्यासोबत चेन्नईला जा आणि माझ्यासोबत तिथे राहण्यास सांगितले. पण मी कमलेशला सांगितले की तू इथेच संघासोबत राहा. मी खाली जाऊन पाहतो तर काय सिक्युरिटी आणि कमलेश तिथे माझ्या आधीपासूनच जाऊन थांबले होते. विमानतळाकडे जाताना कमलेशला रोहितचा फोन आला, रोहितने माझी विचारपूस केली आणि त्याला या कठीण काळात माझ्यासोबत राहण्यास सांगितले.

रात्रीचे साडेनऊ वाजले होते. मी रोहितचे वागणे पाहून पूर्णपणे थक्क झालो होतो. मी याचा विचारही करू शकत नाही. तिथे दोनच जण होते ज्यांच्याशी मी बोलू शकलो. पण तिथे कोणीच नसतं तर? माझ्या डोक्यात विचार आला की जर मी कर्णधार असतो तरी मीही माझ्या खेळाडूला अशा स्थितीत घरी परत जाण्यास सांगेन. पण मी पण त्याची विचारपूस करण्यासाठी लोकांना कॉल करेन का? मला माहीत नाही. हे खूपच अविश्वसनीय होतं. त्या दिवशी मला रोहित शर्मामध्ये एक उत्कृष्ट नेता दिसला.”

खेळाडूंप्रती रोहितची असलेली सहानुभूती आणि त्यांना पाठिंबा देणं यामुळेच रोहित एक यशस्वी कर्णधार आहे, असे अश्विनचे ​​मत आहे. “मी अनेक कर्णधार आणि नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली खेळलो आहे, पण आज रोहित शर्मा जे काही आहे ते त्याच्या चांगुलपणामुळे. धोनीच्या बरोबरीने पाच आयपीएल विजेतेपद पटकावणारा तो खेळाडू आहे तो. देव हे सहज कोणाला देत नाही. या सगळ्यापेक्षा त्याला काहीतरी मोठं मिळायला हवं, जे देव त्याला नक्कीच देईल. आजकालच्या या स्वार्थी जगात दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणारा माणूस मिळणं दुर्मिळ आहे. या प्रसंगानंतर माझ्या मनात रोहितबद्दलचा आदर खूप वाढला आहे. एक नेता म्हणून मला त्याच्याबद्दल आधीच आदर होता, तो शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूला प्रश्न न करता पाठींबा देतो. ही काही सोपी गोष्ट नाही. धोनीही ते करतो. पण रोहित त्याच्यापेक्षा १० पटीने करतो.”

संघात परतल्यावर, अश्विनने २ वेळा ५ विकेट् घेत सर्वाधिक २६ बळी मिळवून मालिकेची सांगता केली.ज्यामध्ये भारताने इंग्लंडला ४-१ च्या फरकाने नमवत दोन-पाच बळी घेतले. ब्रेंडन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स यांनी संघाची धुरा स्वीकारल्यानंतर इंग्लंड संघाचा हा पहिलाच मालिका पराभव होता.