Rishabh pant car accident : भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. त्याच्यावर देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, अपघात झाल्यानंतर ऋषभ पंतची मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले असून त्याने ऋषभला कारमधून कसे बाहेर काढले होते? तसेच अपघातानंतर ऋषभ पंतची स्थिती काय होती, याबाबत या व्यक्तीने सविस्तर माहिती दिली आहे.

हेही वाचा >>> Rishabh Pant Car Accident: अपघातानंतर अनेकवेळा पलटी झाली कार; पंतला मदत करण्याऐवजी तरुणांनी पैसे घेऊन काढला पळ

इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार बसचालक असलेल्या सुशील नावाच्या व्यक्तीने ऋषभ पंतची मदत केली होती. सुशील यांनी सांगितल्यानुसार ‘ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर ऋषभनेच मला त्याची ओळख सांगितली. मी क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे, असे त्याने मला सांगितले. ऋषभ पंतच्या कारने पेट घेतला होता. त्यांतर मी धावत गेलो आणि कारची काच फोडून त्याला बाहेर काढले,’ अशी माहिती सुशील यांनी दिली.

‘मी हरिद्वारहून येत होतो तर ऋषभ पंत दिल्लीहून येत होता. त्याची कार दुभाजकावर आदळली. त्यानंतर मी माझी बस थांबवून मदतीसाठी धावलो,’ असेही सुशील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Rishabh Pant Accident: पंतचा अपघातानंतरता पहिला व्हिडीओ आला समोर, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर होता उभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऋषभ पंत आपल्या मर्सिडीज कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तत्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे. पंतचं डोकं, गु़डघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचा पाय मोडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.