scorecardresearch

Rishabh Pant: “मी पूर्णपणे रिकव्हर…” अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, मैदानात परतण्यासंदर्भात किती वेळ लागेल जाणून घ्या

Rishabh Pant Latest Tweet: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या अपघातावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने चाहत्यांसाठी आणि बीसीसीआयसाठी एक ट्विट केले आहे.

Rishabh Pant: “मी पूर्णपणे रिकव्हर…” अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, मैदानात परतण्यासंदर्भात किती वेळ लागेल जाणून घ्या
सौजन्य- (ट्विटर)

Rishabh Pant Latest Tweet: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला ३० डिसेंबर २०२२ रोजी भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याने ट्विट करून चाहते आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आता किमान ६-७ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार ऋषभ पंत गेल्या महिन्यात त्याच्या कार अपघातानंतर रुग्णालयात आहे. त्याच्या रिकव्हरी आणि शस्त्रक्रियेबाबत सतत मीडिया रिपोर्ट्स येत आहेत. त्याचे पुनरागमन आणि शस्त्रक्रियेबाबत वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळी विधाने समोर येत होती. अशा स्थितीत क्रिकेटपटूचे योग्य आरोग्य अपडेट उपलब्ध नव्हते, मात्र आता खुद्द ऋषभ पंतने त्याच्या प्रकृती आणि शस्त्रक्रियेबाबत अपडेट दिले आहे.

अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया

ऋषभ पंतने ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. पुनर्प्राप्तीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. (BCCI) बीसीसीआय, जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांचे त्यांच्या अतूट पाठिंब्याबद्दल आभार. ‘ ऋषभ पंत सध्या मुंबईत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे आणि तो वेगाने बरा होत आहे, त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये ऋषभ पंतने लिहिले की, “माझ्या हृदयाच्या तळापासून, मी माझ्या सर्व चाहते, सहकारी, डॉक्टर आणि फिजिओचे त्यांच्या प्रोत्साहनासाठी आभार मानू इच्छितो. तुम्हा सर्वांना मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

पंतचा भीषण अपघात झाला होता

२५ वर्षीय ऋषभ पंत ३० डिसेंबरच्या सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. त्यानंतर त्यांची कार दुभाजकाला धडकली. यानंतर हरियाणा रोडवेजच्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने पंतला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. पंत कारमधून बाहेर पडताच ती पूर्णपणे पेटली होती. त्याच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही अडचण नाही. बीसीसीआय पंतच्या सतत संपर्कात आहे. त्याचबरोबर पंत लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI: “कुछ भी करनेका लेकीन फॅन्स का इगो…”, काँग्रेसचा केरळच्या क्रीडामंत्र्यांवर दोषारोप

टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक

ऋषभ पंतने २०२२ मध्ये टीम इंडियासाठी एकूण ७ सामने खेळले. यादरम्यान त्याने ६१.८१ च्या सरासरीने ६८० धावा केल्या. कसोटीत तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतने गेल्या वर्षी भारतासाठी १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७.३३ च्या सरासरीने ३३६ धावा केल्या होत्या. टी२० बद्दल बोलायचे झाले तर या फॉरमॅटमध्ये त्याने गेल्या वर्षी २५ सामने खेळताना २१.४१ च्या सरासरीने केवळ ३६४ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 20:42 IST

संबंधित बातम्या