Rohit Sharma first meeting with Shubman Gill after captaincy change video: भारतीय संघ वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेनंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा भारताच्या एअरपोर्टवरील व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियामधील दिग्गज खेळाडू विराट कोहलील आणि रोहित शर्मा संघात परतले आहेत. रोहित-विराटसह संपूर्ण भारतीय संघ दिल्लीवरून रवाना झाला.
रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर शुबमन गिलला टीम इंडियाच्या वनडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. यानंतर गिल आणि रोहित पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी भेटले होते. रोहित-गिल यांच्यातील या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये रोहित विराटची पहिल्या भेटीनंतर प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये सुरूवातीला रोहित शर्मा त्याच्या बॅगमध्ये सामान ठेवताना दिसत आहे. तितक्यात मागून भारताचा नवा वनडे कर्णधार शुबमन गिल येऊन रोहितच्या खांद्यावर हात ठेवतो. रोहित लगेच मागे वळून पाहतो आणि त्याला आपल्या नेहमीच्या बिनधास्त स्वभावात हात मिळवत म्हणतो, “अरे हिरो, कसं काय चाललंय भाई” आणि त्याला मिठी मारतो. रोहित-गिलच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरले आहेत.
विराटला पाहताच रोहित शर्माचा अनोखा सॅल्युट
यानंतर लगेच पुढे रोहित शर्मा टीम बसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडत असतो आणि त्याच्याआधीच बसमध्ये खिडकीजवळ विराट कोहली बसलेला असतो. विराट कोहलीला पाहताच रोहित शर्मा एका हाताने त्याला नमस्कार आणि सॅल्युट केल्यासारखी अॅक्शन करतो. कारण रोहितच्या एका हातात त्याने कॉफी पकडलेली आहे. यानंतर रोहित टीम बसमध्ये चढताच विराटला मिठी मारतो.
विराट रोहितच्या भेटीनंतर गिल विराटला हात मिळवतो, त्यानंतर बाजूला बसलेल्या श्रेयसला तो हात मिळवत असतो. तितक्यात विराट त्याच्या पाठीवर थाप देत त्याचं कौतुक करतो. यानंतर टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एअरपोर्टला निघतानाचा प्रवास पुढे व्हीडिओमध्ये दाखवला आहे. यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा त्यांच्या खास चाहत्यांना ऑटोग्राफही देताना दिसले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ (India Squad for ODI Series vs Australia)
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल