Rohit Sharma Axar Patel video: भारताच्या टी-२० विश्वचषकातील काही भारतीय खेळाडूंनी नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती लावली आहे. ज्याच्यामध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग हे खेळाडू आहेत. हा एपिसोड या आठवड्यात टेलिकास्ट होणार असून तत्पूर्वी नेटफ्लिक्स काही प्रोमो आणि छोटे व्हीडिओ शेअर करत आहेत. या शोमध्ये खेळाडूंनी दिलखुलास गप्पा मारल्या काही गेम्स खेळले तर काही मजेशीर खुलासेही केले. अशाच एका खेळाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

कपिल शर्मा शोमध्ये खेळाडूंना एक टास्क मिळाला की ज्यामध्ये समोरच्या खेळाडूच्या हातातील कार्डवर क्रिकेटपटूचं नाव असणार आणि समोरच्याने अभिनय करून ज्याच्या हातात कार्ड आहे त्याने हे ओळखायचं. रोहित शर्मा अभिनय पाहून ओळखणार होता तर अक्षर पटेल हा अभिनय करणार होता. यामध्ये कार्डवर महेंद्रसिंह धोनीचं नाव होतं.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

भारतीय संघाचा महान यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याचा खास ट्रेडमार्क शॉट ‘हेलिकॉप्टर शॉट’ देखील प्रसिद्ध आहे. मात्र अक्षर पटेल धोनीच्या या खास शॉटची कॉपीही करू शकला नाही, त्यामुळे रोहित शर्माने त्याची चांगलीच फिरकी घेतली.

तर या व्हीडिओमध्ये घडलं असं की रोहित शर्माच्या हातात महेंद्रसिंह धोनीचं नाव लिहिलेलं कार्ड होतं आणि अक्षर पटेल समोर अभिनय करण्यासाठी सज्ज होता. अक्षरने सरळ एक षटकार लगावल्याचा अभिनय केला. अशातच अक्षर पटेलने धोनीच्या विश्वचषकातील प्रसिद्ध षटकाराची नक्कल केली. पण रोहितला अक्षरचा अभिनय नेमका समजला नाही कारण तो एक सामान्य षटकार होता जो सर्व फलंदाजांनी मारला होता. हा अभिनय पाहून रोहित म्हणाला, “प्रत्येकजण असे षटकार मारतो. थोड्या वेगळं काहीतरी करू दाखव..”

हेही वाचा – R Ashwin: अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार द्यायचा वेस्ट इंडिज बोर्डाला विसर; विश्वविक्रम गेला लांबणीवर

रोहितचं बोलणं ऐकून सूर्यकुमार यादव उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी करून दाखवू का थांब मी दाखवतो, लगेच ओळखतील.’ SKY ने धोनीचा हेलिकॉप्टर शॉटची नक्कल करून दाखवली, जे पाहून रोहितने एका सेकंदात ‘MSD’ असे म्हटले. रोहितने लगेच बरोबर उत्तर ओळखलं. तितक्यात अक्षर पटेलने लगेच आपली बाजू मांडली. तो म्हणाला, ‘मी वर्ल्ड कपमधला षटकार मारला होता.’ हे ऐकून रोहित म्हणाला, ‘अरे हेलिकॉप्टर फिरव ना.’ सोशल मीडियावर या मजेशीर घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक