Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor : क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर काही वर्षांपूर्वी निवृत्त होऊनही अजूनही चर्चेत आहे. सचिन तेंडुलकर एका पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर तीन स्टंपप्रमाणे उभ्या असलेल्या झाडांचा फोटो शेअर केले आहे. यावर मास्टर ब्लास्टरने लिहिले की, ‘तुम्ही अंदाज लावू शकता का की कोणत्या अंपायरला स्टंप इतका मोठा वाटायचा?’ सचिनच्या या पोस्टमुळे चाहत्यांच्या वाईट आठवणी ताज्या झाल्या आणि माजी अंपायर स्टीव्ह बकनर चर्चेत आला.

सचिन तेंडुलकरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत –

वास्तविक, वेस्ट इंडिजच्या या माजी अंपायरलन सचिन तेंडुलकरविरुद्ध अनेक चुकीचे निर्णय दिले होते, ज्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला. त्याचे दोन असे वादग्रस्त निर्णय होते, जे आजही चाहत्यांच्या मनात आहेत. यापैकी एक २००३ मध्ये गब्बा कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियातील आहे. तर दुसरा २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ईडन गार्डन्सवरील सामन्यातील आहे. या दोन्ही सामन्यांदरम्यान स्टीव्ह बकनरच्या चुकीच्या निर्णयांमुळे सामन्याची दिशाच बदलली होती. सचिनची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांच्या या वाईट आठवणी ताज्या झाल्या.

सचिनच्या विरोधात देण्यात आलेले वादग्रस्त निर्णय –

२००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सचिनला चुकीच्या पद्धतीने एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले होते. कारण चेंडू विकेट्सवरून जात असल्याचे रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते. पण बकनरला ते मान्य नव्हते. त्या काळात अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे सचिनला परत जावे लागले. तर २००५ च्या कसोटीत सचिनला अब्दुल रझाकच्या चेंडूवर झेलबाद देण्यात आले होते. त्यावेळी आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. पण अंपायर बकनरने त्याला बाद घोषित केले.

हेही वाचा – Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं

स्टीव्ह बकनरची कारकीर्द –

सचिनची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी लगेच स्टीव्ह बकनरचा उल्लेख करायला सुरुवात केली. १९८९ ते २००९ पर्यंत, बकनरने १२८ कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंग केली. याशिवाय, तो १८१ एकदिवसीय सामन्यांमध्ये अंपायर होता. बकनर १९९२ ते २००७ या कालावधीत सलग पाच विश्वचषक फायनलमध्ये अंपायर म्हणून काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन तेंडुलकरच्या पोस्टवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया –

अंपायरिंग करण्यापूर्वी, बकनर हे फुटबॉल खेळाडू आणि हायस्कूल शिक्षक देखील होते. बकनरने मार्च १९८९ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले होते. अंपायरिंग घेण्यापूर्वी, बकनर हे फुटबॉल खेळाडू आणि हायस्कूल शिक्षक देखील होते.