भारत आणि श्रीलंका संघांत गुरुवारी तीन सामन्यांच्या मालितकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सात वाजता सुरुवात होईल. पहिला सामना भारतीय संघाने २ धावांनी जिंकला. त्यामुळे भारतीय संघाकडे मालिकेत १-० ने आघाडी आहे. तसेच दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ देखील विजय मिळवून, मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सज्ज असेल. तसेच मागील सामन्यात भारतीय संघाने तोंडाजवळचा घास हिसकावून घेतला होता. त्यामुळे या गोष्टीचा बदला घेण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. त्या दृष्टीने श्रीलंका संघात देखील बदल पाहिला मिळू शकतो.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.संजू सॅमसनला पहिल्या सामन्यात झेल घेताना गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो टीम इंडियासोबत पुण्याला जाऊ शकला नाही. त्याच्या जागी जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश केला आहे.

पुण्यातील एमसीए स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल –

एमसीए स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. उसळी घेणाऱ्या या खेळपट्टीवर काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे. इथली खेळपट्टी सपाट आहे, त्यामुळे फलंदाजांना मजा येणार आहे. मात्र, नवीन चेंडूमुळे वेगवान गोलंदाज काहीसा त्रास देऊ शकतात. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७१ आहे. यावरून हे सिद्ध होते की, खेळपट्टी फलंदाजांसाठी सोपी असणार आहे.

पुण्याचे हवामान कसे असेल –

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. सामन्याची नाणेफेक अर्धा तास आधी होईल. पुण्यातील हवामान स्वच्छ असल्याने चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा थरार पाहता येणार आहे. पुण्यात संध्याकाळी तापमान २७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथे आर्द्रता ४४ टक्के राहील, तर वारा १४ किमी प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. पुण्यात पावसाने खेळ केला नाही, तर सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे.

शुबमन गिलला पुन्हा संधी मिळेल का?

सलामीच्या स्थानासाठी गिलचा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात स्पर्धा आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिल अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

युझवेंद्र चहलला आणखी एक संधी मिळणार का?

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असला, तरी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल महागडी ठरला होता. त्याने फक्त दोन षटके टाकली होती. ज्यामध्ये त्याने २६ धावा दिल्या होत्या. त्याचबरोबर त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या जागी वाशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकतो.

हेही वाचा – Cristiano Ronaldo: “माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत येणं…”, सौदी अरेबियाचा चुकीचा उल्लेख करणारा रोनाल्डोचा video व्हायरल

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, आणि वाशिंग्टन सुंदर

श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanju samson has been ruled out of team india due to injury before ind vs sl 2nd t20 the indian team will be playing xi vbm
First published on: 05-01-2023 at 14:29 IST