भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ९ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ही घोषणा बीसीसीआने शुक्रवारी रात्री केली आहे. या संघात सूर्यकुमार यादवला स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर ऋषभ पंतला वगळल्यामुळे इशान किशनची निवड झाली आहे. त्यानंतर सरफराज खानची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे.
याशिवाय एक नाव असे होते की, जे संघात न दिसल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. हा खेळाडू दुसरा कोणी नसून मुंबईचा सरफराज खान आहे. सरफराज गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी करत आहे. त्याची सरासरी इतकी चांगली आहे की त्याला भारतीय ब्रॅडमन म्हटले जात आहे, परंतु तरीही त्याला संघात स्थान मिळत नाही.
सरफराजकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर अनेक भारतीय चाहते सोशल मीडियावर बीसीसीआयवर टीका करत आहेत. दरम्यान, सरफराजने त्याच्या इंस्टाग्रामवर काही स्टोरी शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. खरं तर, सरफराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देशांतर्गत क्रिकेटची आकडेवारी शेअर केली आहे.
युवा फलंदाजांनी पहिल्या फोटोत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील किमान ५० सामन्यांमधील सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचे नाव महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याखाली आहे. बॅडमॅनची फलंदाजीची सरासरी ९५.१७होती, तर सरफराजने या काळात ८०.४७च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

दुसऱ्या स्टोरीत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटची आकडेवारी शेअर केली आहे. हे आकडे त्याच्या पहिल्या ३० प्रथम श्रेणी सामन्यांचे आहेत. सरफराजने या काळात ११०.७३च्या सरासरीने २४३६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने त्रिशतकाशिवाय ९ शतकी खेळी केल्या आहेत.

त्याच्या सध्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ३६ सामन्यांमध्ये ८०.४७च्या अविश्वसनीय सरासरीने ३३८० धावा केल्या आहेत. सरफराजची बॅट गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. २०१९-२० हंगामात त्याने १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा केल्या, तर २०२१-२२ मध्ये त्याने १२२.७५च्या सरासरीने ९८२ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – Indian squad: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विराट-रोहितला डच्चू ; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मज शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.