MS Dhoni Birthday: भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी आज त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. तो सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. यासोबतच त्याने चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्याचबरोबर धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसोबतच अनेक दिग्गज खेळाडूही त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू रवींद्र जडेजानेही धोनीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर, त्याने धोनीला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रवींद्र जडेजाने धोनीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या

माहितीसाठी की, रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “२००९ पासून आजपर्यंत आणि कायमच मी तुमच्यासोबत असणार आहे. माही भाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटू पिवळ्या जर्सीत.” यावर्षी या त्याच्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत कारण, अलीकडेच आयपीएल २०२३मध्ये धोनी आणि जडेजामध्ये बरेच वाद झाले होते. रवींद्र जडेजा सीएसकेला सोडणार देखील होता. मात्र, विजयानंतर त्यांच्यात समेट घडवून आणण्यात चेन्नईच्या फ्रँचायझी मालकांना यश आले होते.

जडेजाच्या या पोस्टवर चाहते खूप लाईक करत आहेत आणि धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत ​​आहेत. आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात CSK संघाला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज होती.

अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाने प्रथम षटकार आणि नंतर चौकार मारून संघाला रोमहर्षक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. माहितीसाठी की, टीमला आयपीएल ट्रॉफीचा विजेता बनवल्यानंतर रवींद्र जडेजाने आपली इनिंग धोनीला समर्पित केली होती. याबरोबरच जडेजाने धोनीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याचवेळी सामना जिंकल्यानंतर धोनीने त्याला उचलून धरले, तो फोटोही वेगाने व्हायरल झाला होता. त्याचवेळी धोनीसोबतचा एक फोटो शेअर करताना हार्दिकने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी आवडती व्यक्ती माही.”

हेही वाचा: PSL: पीएसएल क्रिकेट संघाचे मालक आलमगीर खान यांनी का केली आत्महत्या? डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीसीसीआयने धोनीसाठी ७० सेकंदांचा खास व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी झटपट शॉट्स घेताना दिसत आहे. बोर्डाने कॅप्शनमध्ये लिहिले, “कॅप्टन, लीडर, लीजेंड. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या एम.एस. धोनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व चाहत्यांसाठी ही आहे वाढदिवसाची भेट. विंटेज एमएसडीचा ७० सेकंदाचा व्हिडिओ.”