Sanjay Manjrekar on Team India: आशिया चषकाच्या तिसऱ्या सामन्यात शनिवारी (२ सप्टेंबर) भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. अ गटातील या आवृत्तीतील भारताचा हा पहिलाच सामना आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ आपला दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याने नेपाळचा पराभव केला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्लेईंगमध्ये मोहम्मद शमीचा समावेश न केल्याने संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नाही. आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात संघाने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह भारत खेळत आहे. याबाबत माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकर यांनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर निशाणा साधला आहे. शमी पाकिस्तानसाठी अधिक घातक ठरू शकला असता, असे त्याचे मत आहे.

Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

पल्लेकेले स्टेडियम, कॅंडी येथे सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघाने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांची वेगवान आक्रमणासाठी निवड केली. याबाबत स्टार स्पोर्ट्सवर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले की, “शार्दुलपेक्षा मोहम्मद शमी पाकिस्तानसाठी अधिक धोकादायक ठरला असता पण तुम्ही फलंदाजीच्या डेप्थचा विचार केला. माझ्यामते गोलंदाजीची डेप्थही महत्त्वाची असते. जर वरचे सहा किंवा सात फलंदाज काही करू शकत नसतील तर तुम्ही आठव्या फलंदाजाकडून काय अपेक्षा करता? हे तुमच्या फलंदाजीतील असुरक्षितता दर्शवते.”

हेही वाचा: IND vs PAK: “कुणाला तरी घरी ठेवावे लागेलच ना…”, रोहित शर्मा आणि बाबरमधील कौटुंबिक संभाषणाचा Video व्हायरल

फलंदाजीतील सखोलता लक्षात घेऊन भारतीय संघाने शमीच्या जागी शार्दुलची निवड केली आहे. शार्दुलने भारतासाठी यापूर्वी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत तो भारतीय संघाला आठव्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्यायही उपलब्ध करून देतो. हे पाहून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. जर आपण फिरकी आक्रमणाबद्दल बोललो तर, भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध कँडी गवताच्या खेळपट्टीवर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांची निवड केली.

जर पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, नेपाळला हरवून या संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. त्यानंतर भारताविरुद्धही पाकिस्तानने आपली प्लेइंग इलेव्हन कायम ठेवली आहे. मांजरेकर पुढे म्हणाले की, “गोलंदाजांकडून फलंदाजीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तुम्ही त्यांच्याकडून विकेट्सची करू शकतात.”

हेही वाचा: IND vs PAK: तो आला, त्याने पाहिलं अन्…; शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीच्याही केल्या दांड्यागुल, पाहा Video

सामन्यात काय झाले?

इशान किशननंतर हार्दिक पांड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वन डेतील ११वे अर्धशतक आहे. त्याने ३४व्या षटकात आगा सलमानच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने ३४ षटकात ४ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या आहेत. इशान किशन नाबाद ७२ आणि हार्दिक पांड्या नाबाद ५० धावांवर खेळत आहेत.