Shreyas Iyer Injury In Nets Session : भारत आणि इंग्लंड संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळलील जाणार आहे. या मालिकेपूर्वी नेटमध्ये सराव करताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली. सरावादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर चेंडू लागला होता. ज्यामुळे तो काही काळासाठी बाहेर गेला होता. त्यानंतर तो काही वेळ बर्फ लावल्यानंतर पुन्हा फलंदाजीला आला.

श्रेयस अय्यरला दुखापत –

दुखापतीची तीव्रता अद्याप कळू शकलेली नाही. तो नेटमध्ये फलंदाजी करत असताना थ्रो-डाउनर चेंडू त्याच्या मनगटावर आदळला. अय्यरच्या दुखापतीमुळे टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण तो संघाच्या मधल्या फळीचा महत्त्वाचा भाग आहे. विराट कोहलीही पहिल्या दोन कसोटींसाठी उपलब्ध नाही. एक दिवस आधी त्याने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. अशा परिस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी फक्त अय्यर आणि केएल राहुलवर आहे. कोहलीच्या जागी रिंकू सिंग, रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

Disappointment of Pakistani fan who sold tractor video viral
IND vs PAK सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या चाहत्याने विकला ट्रॅक्टर, भावुक होत सांगितली व्यथा, VIDEO व्हायरल
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
Brydon Carse banned all format
Brydon Carse : इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजावर बंदी, सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई
Gautam Gambhir reaction to KKR title
“…उसका रथ आज भी श्रीकृष्ण ही चलाते हैं”, KKRला चॅम्पियन बनवल्यानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल
Brett Lee on Jasprit Bumrah
T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
Virat Needs 29 runs to reach 8000 runs complete in IPL history
RR vs RCB : एलिमिनेटर सामन्यात विराट इतिहास रचण्यासाठी सज्ज! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू
MS Dhoni avoided shaking hands with RCB players after defeat
IPL 2024 : आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर धोनीचा शोध घेतानाचा विराट कोहलीचा VIDEO व्हायरल
Yash Dayal's video call to his mother after the win
IPL 2024 : ‘आता तुला कसं वाटतयं आई?’, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर यश दयाल व्हिडीओ कॉलवर भावूक

हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंडचा सराव सुरु –

सलामीच्या कसोटीपूर्वी दोन्ही संघ हैदराबादमध्ये सराव करत आहेत. इंग्लंडचा संघ रविवारी रात्री एक दिवस आधी हैदराबादला पोहोचला. याआधी इंग्लंडने आता भारताप्रमाणेच धाबीत सराव केला होता. तिथे वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे व्हिडिओ पाहून सरळ स्विंग गोलंदाजी शिकत होता. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे. सध्या चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड सातव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – ICC ODI Team : आयसीसीने जाहीर केला २०२३ मधील सर्वोत्तम वनडे संघ, रोहित शर्मासह ‘या’ सहा भारतीयांना मिळाले स्थान

पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.