Shubman Gill Continues Tradition of Rohit, Virat, Dhoni Video: भारतीय क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरूद्ध २-० असा एकतर्फी मालिका विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला. नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली हा टीम इंडियाचा पहिला मालिका विजय आहे. या मालिका विजयाची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर गिलने टीम इंडियाची परंपरा कायम ठेवली आहे.

गिलने एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची परंपरा पुढे कायम सुरू ठेवली. या तिघांनीही भारताच्या मालिका विजयानंतर कायम ट्रॉफीही संघातील युवा खेळाडूच्या हाती दिली आहे. गिलने जगदीशनला ट्रॉफी दिल्यानंतर संघाने विजयाचा आनंद साजरा केली. याचा व्हीडिओही व्हायरल होत आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन दिलेल्या वेस्ट इंडिजचा दुसरा डाव ३९० धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य मिळाले. जे भारताने सहज गाठत वेस्ट इंडिजविरूद्ध मालिका विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे.

दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाने केवळ तीन विकेट्स गमावून विजय मिळवला. केएल राहुल १०८ चेंडूत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ५८ धावा करत नाबाद परतला. तर अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४० धावांनी पराभव केला होता होता आणि मालिकेत आघाडी मिळवली.

शुबमन गिलने धोनी, विराट, रोहितची परंपरा कायम ठेवत कोणाकडे दिली मालिका विजयाची ट्रॉफी?

कर्णधार शुबमन गिलला भारताच्या मालिका विजयानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्रॉफी दिली. गिलने ट्रॉफी स्वीकारल्यानंतर तो संघाजवळ गेला. जिथे त्याने ही ट्रॉफी संघातील युवा खेळाडू एन जगदीशन याच्याकडे सुपूर्द केली. एन जगदीशनला भले या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही, पण तो संघातील नवा खेळाडू होता.

दुसऱ्या कसोटी सामन्याचा सामनावीर कुलदीप यादव ठरला, ज्याने या सामन्यात एकूण ८ विकेट्स घेतले. तर मालिकावीरचा पुरस्कार रवींद्र जडेजाला देण्यात आला. जडेजाने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. जडेजाने पहिल्या कसोटीत शतकी कामगिरी केली होती.