Shubman Gill’s record century: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात सलामीवीर शुबमन गिलने शतक झळकावले आहे. गिलचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. या शतकाच्या जोरावर शुबमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. शुबमन गिलने फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले. या वर्षी जानेवारीमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्येही शतक झळकावले होतेय आणि आता त्याने या वर्षीही कसोटीत शतक झळकावले आहे.

यासह, शुबमन गिल २०२३ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर एका कॅलेंडर वर्षात सर्व फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, सुरेश रैना आणि केएल राहुल यांनी हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – WPL 2023 GGW vs DCW: गुजरात जायंट्सचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

एकाच कॅलेंडर वर्षात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारे भारतीय खेळाडू –

१.रोहित शर्मा
२.सुरेश रैना
३.केएल राहुल
४.शुबमन गिल

शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात १९४ चेंडूंचा सामना करत १०० धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला. यादरम्यान गिलची सरासरी ५० च्या वर राहिली. त्यानंतर शुबमन गिल १२८ धावांवर बाद झाला. त्याला नॅथन लायनने पायचित केले. या खेळीत गिलने २३५ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: शुबमन गिलने मोडला पाकिस्तानच्या युनूस खानचा विक्रम; मिचेल स्टार्कची धुलाई करत रचला विश्वविक्रम

कसोटीतील दुसऱ्या शतकासह शुबमन गिल भारतातील दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. सचिन तेंडुलकरने वयाच्या २३ व्या वर्षी आपल्या कारकिर्दीत २२ शतके ठोकली होती. विराट कोहलीने वयाच्या १५व्या वर्षी आणि आता गिलने वयाच्या २३व्या वर्षी सातवे शतक झळकावले आहे. या यादीत रवी शास्त्री (७ शतके) आणि युवराज सिंग (७शतके) यांचा समावेश आहे.

वयाच्या २३ व्या वर्षी भारतासाठी सर्वोच्च शतक –

सचिन तेंडुलकर -२२
विराट कोहली – १५
शुबमन गिल -७*
रवी शास्त्री – ७
युवराज सिंग -७

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill scored a century to join virat sachins 23 year old club of most centuries vbm
First published on: 11-03-2023 at 19:54 IST