Sourav Ganguly questions Rohit Sharma’s decision: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. लंडनमधील ओव्हल येथे हा सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना क्षेत्ररक्षण देण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ फक्त एकच फिरकीपटू घेऊन मैदानात उतरला आहे. तो फिरकी गोलंदाज म्हणजे रवींद्र जडेजा. अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही रोहितच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रोहितच्या निर्णयावर गांगुलीने उपस्थित केले प्रश्न –

या सामन्यात रोहितऐवजी तो कर्णधार असता तर अश्विनसारख्या दर्जेदार फिरकीपटूला संघाबाहेर ठेवणे फार कठीण गेले असते, असे सौरव गांगुलीचे मत आहे. रोहित शर्माने अश्‍विनच्‍या जागी जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्‍ये स्‍पिनर म्हणून सामील केले आहे. त्याचबरोबर इशान किशनच्या जागी केएस भरतला संधी मिळाली आहे. गांगुलीशिवाय पाँटिंगनेही अश्विनच्या बाहेर बसण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

सौरव गांगुली काय म्हणाला?

पहिले सत्र संपल्यानंतर सौरव गांगुली स्टार स्पोर्ट्स शोमध्ये म्हणाला, “बघा, नंतरची गोष्ट आहे की सामन्याचा निकाल काय लागेल? मी नंतरच्या विचारांवर विश्वास ठेवत नाही. एक कर्णधार म्हणून, तुम्ही नाणेफेकीपूर्वी ठरवा की प्लेइंग इलेव्हन काय असेल आणि भारताने चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांत भारताला ४ वेगवान गोलंदाजांसह यश मिळाले, असे बोलले जात आहे, पण जर मी कर्णधार असतो, तर अश्विनसारख्या दर्जेदार फिरकीपटूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणे माझ्यासाठी खूप कठीण झाले असते.”

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: “जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या…”, भारताच्या प्लेइंग इलेव्हनवरुन रिकी पाँटिगची रोहित शर्मावर टीका

जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना जास्त त्रास देतो – रिकी पाँटिग

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रिकी पाँटिग म्हणाला, “भारताने सामन्याच्या पहिल्या डावासाठी फक्त गोलंदाजी आक्रमण निवडण्याची चूक केली. ऑस्ट्रेलियात संघांत अनेक डावखुरे फलंदाज आहेत. जडेजापेक्षा अश्विन डावखुऱ्या फलंदाजांना जास्त त्रास देतो. मला खेळपट्टीवर गवत दिसले. हो गवत होते, पण खोलवर पाहिल्यावर मला ते सुकलेले दिसत होते.”

आश्विनला वगळणे हा एक कठीण निर्णय – रोहित शर्मा

नाणेफेक दरम्यान रविचंद्रन अश्विनला न खेळवण्याच्या निर्णयाबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अवघड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो (आश्विन) आमच्यासाठी मॅचविनर राहिला आहे. त्याला वगळणे हा एक कठीण निर्णय आहे, परंतु तुम्हाला संघाच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.”

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: श्रीकर भरतचा सुपरमॅन अवतार! हवेत झेप घेत डेव्हिड वार्नरचा टिपला अप्रतिम झेल, पाहा VIDEO

भारताची प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Story img Loader