Sreesanth Says Rinku Singh is like Muhammad Ali in my eyes : भारतीय संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंगने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत लोकांना वेड लावले आहे. निळ्या संघासाठी मॅच फिनिशरच्या भूमिकेत तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यामुळेच चाहत्यांपासून क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत सर्वच जण त्याला भावी टीम इंडियाचा स्टार म्हणत आहेत. अलीकडेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात त्याने कठीण परिस्थितीत लढाऊ खेळी खेळली होती. यानंतर त्यांची ख्याती आणखी वाढली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर एस श्रीसंतही रिंकू सिंगच्या फलंदाजीने खूप प्रभावित झाला आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधताना श्रीसंतने युवा फलंदाजाचे कौतुक करताना मोठे विधान केले. तो म्हणाला, “मला रिंकू सिंगचा आत्मविश्वास आवडतो. तो कोणत्याही संघाचा भाग असो, मग ते क्लब क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा फ्रँचायझी क्रिकेट असो, तो सतत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. तो मैदानात मनापासून खेळतो. त्यामुळे तो माझ्या नजरेत मुहम्मद अलीसारखा आहे.”
रिंकू सिंगने ९९ च्या सरासरीने केल्या धावा –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत रिंकू सिंगने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने ४ सामन्यांच्या ३ डावात ९९ च्या सरासरीने ९९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १९०.३८ आहे. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले आहेत. रिंकूने ९ सामन्यांच्या ५ डावात ८७ च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत. त्याने केवळ ८८ चेंडूंचा सामना केला आहे. त्याने १६ चौकार आणि ११ षटकार मारले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० रविवारी बंगळुरू येथे खेळवला जाणार आहे.
हेही वाचा – IPL 2024: ‘बच्चे, इजी हो जा…’, नवीनशी झालेल्या भांडणानंतर ‘या’ पाकिस्तानी खेळाडूने विराटला केला होता मेसेज
रिंकू सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –
रिंकू सिंगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने ब्लू टीमसाठी आतापर्यंत एकूण नऊ टी-२० सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून पाच डावांमध्ये ८७.० च्या सरासरीने १७४ धावा झाल्या आहेत. सध्या रिंकूचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक किंवा अर्धशतक नाही. त्याची सर्वोत्तम खेळी ४६ धावांची आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने १९७.७३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.